आमदार बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलभाऊंचा शेतकरी सेवेचा वारसा जपा 

वसंत कांबळे 
Wednesday, 2 September 2020

श्री. शिंदे पुढे म्हणाले, कृषिमाल निर्यात सुविधा व शेतकऱ्यांना उच्चतम प्रतीच्या व योग्य मूल्यांच्या निविष्ठा उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान जरी जगामध्ये उपलब्ध होत असले तरी त्याचा वापर हा शेतकरी कल्याणासाठीच झाला पाहिजे. कृषिमाल निर्यात हा शेती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय कळीचा मुद्दा असून, या निर्यातीचा थेट परिणाम शेतमालाच्या स्थानिक बाजारपेठेवर होताना आपल्याला दिसतो.

कुर्डू (ता. सोलापूर) : देशामधीलच नव्हे तर जगातील उत्तमोत्तम शेतमाल निर्यात कंपनीच्या कामांप्रमाणे विठ्ठल गंगा फार्मर्स कंपनीने अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे. कै. विठ्ठलभाऊंचा शेतकरी सेवेचा वारसा विठ्ठलगंगा फार्मर्स कंपनीने जपावा, असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी कंपनीच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना केले. 

हेही वाचा : धक्कादायक ! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन बालकांना मातेने दिले दुसऱ्यांच्या ताब्यात 

या वेळी आमदार शिंदे यांनी निमगाव टें, दहिवलीमध्ये माढा तालुक्‍यातील पहिल्या अत्याधुनिक पॅक हाउस, कूलिंग, कोल्ड स्टोअरेजच्या कामांची सविस्तर माहिती घेतली व मार्गदर्शक सूचनाही केल्या. या वेळी विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य प्रवर्तक धनराज शिंदे, निमगाव टें चे सरपंच रवींद्र शिदे, महेश डोके, राहुल वरपे, विलास देशमुख, आनंद पानबुडे, तोहित सय्यद, अमर शहा, महेश मारकड, सुजित भोसले, बापू शिंदे, नितीन मराठे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा : ब्रेकिंग ! जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी दिलीप माने यांचे नाव निश्‍चित 

श्री. शिंदे पुढे म्हणाले, कृषिमाल निर्यात सुविधा व शेतकऱ्यांना उच्चतम प्रतीच्या व योग्य मूल्यांच्या निविष्ठा उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान जरी जगामध्ये उपलब्ध होत असले तरी त्याचा वापर हा शेतकरी कल्याणासाठीच झाला पाहिजे. कृषिमाल निर्यात हा शेती क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय कळीचा मुद्दा असून, या निर्यातीचा थेट परिणाम शेतमालाच्या स्थानिक बाजारपेठेवर होताना आपल्याला दिसतो. यामध्ये शीतसाखळी कायम ठेवून दीर्घ मुदतीत व आखाती देशांमध्ये तसेच जगातील इतर सर्व शक्‍य त्या प्रांतांमध्ये शेतमाल विक्रीची व्यवस्था करताना सर्व प्रकारची दक्षता आणि सजगता ठेवणे गरजेचे आहे. विठ्ठल गंगा फार्मर्स कंपनीला त्यांच्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये सर्वतोपरी सहकार्य करू. पन्नास वर्षांपासून सामाजिक आणि शेतकरी सेवेचा वसा कै. विठ्ठलभाऊंच्या कुटुंबाने जपलेला असून, सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सेवेला आम्ही प्रथम प्राधान्य दिले आहे. 

या वेळी कृषी तज्ज्ञ युवराज शिंदे यांनी कंपनीच्या कामाची सविस्तर माहिती दिली.

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Babanrao Shinde inspected Vitthal Ganga Farmers Company