पाण्याखाली गेलेली पिके व घरे पाहून आमदार माने झाले.भावूक

amdar mane.jpg
amdar mane.jpg

बेगमपूर(सोलापूर) ः भीमा व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना नक्कीच नुकसान भरपाई मिळेल. तत्पूर्वी या नैसर्गिक आपत्तीचा आपण सर्वांनी संयम ठेवून धैर्याने सामना करुया, अशी भावनिक हाक देत मोहोळचे आमदार यशवंत माने व लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांनी बेगमपूर (ता.मोहोळ) येथे पूरग्रस्तांशी संवाद साधला. 


भीमेला आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या भागाची आमदार माने व युवा नेते बाळराजे यांनी भेट देवून पाहणी केली. या वेळी तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी गणेश मोरे, कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, विस्तार अधिकारी संदीप खरबस, मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर माळी, सरपंच हरीभाऊ काकडे, जाकीर चौधरी, महिबूब तांबोळी,पप्पू ताकमोगे, पपुल शेख, मुबिन चौधरी, शंकर सरवळे, सोमनाथ कसबे, ग्रामसेवक हरिष पवार, तलाठी गणेश साठे, भागवत महाडिक, दिलीप पाटील, अरुण पाटील, चंद्रकांत झेंडेकर, सिद्धेश्वर लाड, संजय विभूते, उत्तम कावळे, फयाज पाटील, अमीन पटेल, सुरेश कावळे, रशीद वळसांगकर, सपाटे, सुभाष सोनवले आदी जण उपस्थित होते. 
बेगमपूरसह अर्धनारी, अरबळी,मिरी या भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

यावेळी आमदार माने म्हणाले, तालुक्‍यातील भीमा व सीना नदीला आलेल्या महापूरामुळे नदीकाठावरील शेतकरी व सामान्य जणांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्ताचे शासकिय पंचनामे तातडीने करून शासन मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याबाबतच्या सूचना महसूल विभागाला दिल्या आहेत. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या जनावरांच्या नुकसानभरपाईसाठी आवश्‍यक पंचनामा अहवालाबाबत सांगली जिल्ह्यातील शासन परिपत्रकाची अंमलबजावणी करून नुकसान भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना आपण विनंती करणार असल्याचे आमदार माने यांनी सांगितले. यावेळी येथील प्राथमिक शाळेत विस्थापित झालेल्या पूरग्रस्तांची आमदार माने व बाळराजे पाटील यांनी आस्थेने चौकशी केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व विस्थापिताना जीवनावश्‍यक वस्तू तातडीने पुरविण्याचे आदेश तहसीलदाराना दिले. यावेळी बाळराजे पाटील यांनी पुरग्रस्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून शासनाची सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. 
या " महापूरात दोन हजाराहून अधिक जनावरे वाहून गेली आहेत. शेती पिकांचे नुकसान ही मोठ्या प्रमाणात झाले आहे. शासन निर्णयानुसार पुरग्रस्तांना शासकीय मदत दिली जाणार असल्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी सांगितले. बेगमपूरसह अर्धनारी, अरबळी, मिरी या भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील अमीनदिन देवस्थान परिसरातून शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पाण्याखाली गेलेली पिके व घरे पाहून आमदार माने भावुक झाले.  

 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com