वाढीव दराच्या वीज बिलांच्या प्रश्‍नावर मनसेचा आंदोलनाचा इशारा 

electric bills.jpg
electric bills.jpg
Updated on

पंढरपूर(सोलापूर)ः सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळात कमीत कमी वीजेचा वापर झालेला असतानाही वीज वितरण कंपनीने पंढरपूर शहर व तालुक्‍यातील घरगुती वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रुपयांची बिले आकारली आहेत. ही वाढीव वीज बिले तातडीने माफ करावीत, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात ग्राहकांचा भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज येथे दिला आहे. 

श्री. धोत्रे म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च पासून सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. या दरम्यानच्या काळात फ्रीज,कुलर, मोठे पंखे, एसी आदी वीजेची उपकरणे ग्राहकांनीबंदठवली होती. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही नागरिकांना फ्रीज, कुलरआदी उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ग्राहकांनीअशी उपकरणे बंद ठेवली होती. या काळात वीजेचा वापर देखील कमी झाला होता. तरीही वीज वितरणकंपनीने वीज ग्राहकांना दुप्पट तिप्पट दरानेवीज बिलाची आकारणी केली आहे. 

याच काळात अनेक ग्राहकांना हजारो रुपयांची वीज बिले आकारली आहेत. जादा दरानेवीज आकारणी केल्यामुळे अनेक ग्राहकांनी धक्का बसला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिले भरण्यास स्पष्टपणे नकार ही दिला आहे. मागील काही दिवसांपासून वीज वसूलीसाठी ग्राहकांना तगादा लावला जात आहे. 
वीज वितरण कंपनीच्या या दंडेलशाही विरोधात आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जन आंदोलन उभे केले जाणार आहे. 
या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर आणि राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना येथील वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराची माहिती देवून येथील अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येत्या आठदिवसात लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करावीत अन्यथापंढरपूर शहर व तालुक्‍यातील सर्व वीज ग्राहकांना सोबत घेवून येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल असा सूचक इशाराहीश्री. धोत्रे यांनी दिला आहे.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com