मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी कुटुंबीयांसह केली कोरोनावर मात 

गो. रा. कुंभार 
Friday, 4 September 2020

राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यासह पत्नी, मुलगी व स्वीय सहाय्यक या चौघांचा कोरूना चाचणी अहवाल 24 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान बारा दिवसांनंतर या चौघांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आमदार यशवंत माने, पत्नी, मुलगी व स्वीय सहाय्यक यांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. 

नरखेड (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील जनतेच्या आशीर्वादाने व डॉक्‍टरांच्या प्रयत्नांमुळे मी व माझे कुटुंबीय कोरोनामुक्त झालो आहोत, अशी माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार यशवंत माने यांनी दिली. 

हेही वाचा : टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री पवार सकारात्मक : आमदार बबनराव शिंदे 

राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यासह पत्नी, मुलगी व स्वीय सहाय्यक या चौघांचा कोरूना चाचणी अहवाल 24 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान बारा दिवसांनंतर या चौघांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आमदार यशवंत माने, पत्नी, मुलगी व स्वीय सहाय्यक यांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. यामुळे इंदापूर तालुक्‍यातील (जिल्हा पुणे) त्यांच्या शेळगाव येथे माने कुटुंबीयांचे जंगी स्वागत करून औक्षण करण्यात आले. यानंतर कुटुंबीयांनी गृहप्रवेश केला. 

हेही वाचा : वडिलांनी स्वप्न दाखवले अन्‌ मुलाने केले पूर्ण; मुलगा अप्पर पोलिस अधीक्षकपदी ! 

या वेळी आमदार माने म्हणाले, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी व जनतेच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी मी लवकरच मोहोळचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मतदारसंघातील झालेली विकासकामे व होणारी विकासकामे यासह सर्वसामान्य जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे. 

पॉझिटिव्ह विचारात पॉझिटिव्ह कोरोनाला निगेटिव्ह करण्याची ताकद 
कोरोना संसर्गित रुग्णांनी घाबरून न जाता उपचारादरम्यान आपले विचार पॉझिटिव्ह ठेवले पाहिजे. पॉझिटिव्ह विचारांमुळे मानसिक संतुलन स्थिर राहून शारीरिक शक्ती मजबूत होते. परिणामी शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हला निगेटिव्ह बनवण्यासाठी यश मिळते. मात्र याबरोबरच वैद्यकीय उपचारांची गरज असते, असे आमदार यशवंत माने यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohol MLA Yashwant Mane became Coronafree with his family