
गेल्या दीड महिन्याच्या काळात आजअखेर देवाच्या दानपेटीमध्ये पाऊण कोटी रुपयांचं दान भाविकांनी टाकले आहे. "कोव्हिड - 19'चे सर्व नियम पाळून मंदिर समितीने मुखदर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. सध्या दर दिवसाला 4 हजार 800 भाविकांना ऑनलाइन मुखदर्शन दिले जात आहे.
पंढरपूर (सोलापूर) : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरपासून विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाल्याने देणगीमध्येही वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, लाकडाउनमुळे मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीवर आणि उत्पन्नावर परिणाम झाला होता. लॉकडाउननंतर श्री विठ्ठलाचे द्वार मुखदर्शनासाठी खुले झाल्यानंतर आता पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे आता उत्पन्नात देखील समाधानकारक वाढ होऊ लागली आहे.
हेही वाचा : उपमहापौर राजेश काळेंवर दुसऱ्यांदा खंडणीचा गुन्हा ! महापालिका अधिकाऱ्यांकडेच मागितली पाच लाखांची खंडणी
गेल्या दीड महिन्याच्या काळात आजअखेर देवाच्या दानपेटीमध्ये पाऊण कोटी रुपयांचं दान भाविकांनी टाकले आहे. "कोव्हिड - 19'चे सर्व नियम पाळून मंदिर समितीने मुखदर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. सध्या दर दिवसाला 4 हजार 800 भाविकांना ऑनलाइन मुखदर्शन दिले जात आहे. 16 नोव्हेंबरपासून आजपर्यंत 78 हजार 500 भाविकांनी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले आहे. ऑनलाइन आणि दानपेटीतील देणगी मिळून आजअखेर 74 लाख रुपयांचे दान जमा झाले आहे. यंदा कोरोनामुळे देणगी कमी असली तरी दहा महिन्यांनंतर त्यामध्ये वाढ झाली आहे. नववर्षाच्या निमित्ताने सुद्धा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जास्तीत जास्त भाविकांनी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यावे, असे आवाहन श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल