मॉर्निंग वॉक व प्रतिकारक्षम पदार्थांचा आहारात समावेश : सिए राज मिणियार यांचा आरोग्य संकल्प 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 3 January 2021

सीए राज मिणियार यांनी मागील वर्षाचे अनुभव व आरोग्याच्या बाबतीत नविन संकल्पाच्या मनोगत व्यक्त केले. 
 

सोलापूर ः सामाजिक काम व कुटुंब या दोन्ही घटकासाठी वेळेचे संतुलन करत असताना मॉनिँर्ग वॉक व आहारविहाराच्या माध्यमातून नव्या वर्षाला मी सामोरा जात आहे. सरत्या वर्षाने मला माझ्या आरोग्याच्या बाबतीत एक संतुलीत दृष्टीकोन दिला आहे. त्याचा उपयोग मी नव्या वर्षात चांगल्या पध्दतीने करणार आहे. 

हेही वाचाः जिल्ह्यात नऊ तुर खरेदी केंद्रे सुरू ; ऑनलाईन नोंदणी सुरू : मिळणार सहा हजार रुपये दर 

सीए राज मिणियार यांनी मागील वर्षाचे अनुभव व आरोग्याच्या बाबतीत नविन संकल्पाच्या मनोगत व्यक्त केले. 
मागील वर्षी पाहिले तर माझ्या आहाराबाबत मी फारसा लक्ष देत नव्हतो. कोरोना संकटामध्ये मी घरात असताना या सर्व गोष्टींचा विचार केला. घरात असताना माझ्या आहाराबद्दल नीट समजून घेतले. तेव्हा मी केवळ माझ्या सामाजिक कार्यामुळे आठवड्यातील तीन दिवस मी बाहेर जेवण घेत असे. त्याबद्दल मी फारसा विचार करत नव्हतो. तसेच बाहेरच्या जेवणामुळे माझ्या प्रकृतीत फारसा फरक पडलेला नव्हता. पण कोरोना काळात मी कुटुंबासोबत जेवण घेऊ लागलो. मी सामाजिक कार्यामुळे कुटुंबाला वेळ देत नव्हतो हे ही लक्षात आले. मग मी घरातील सर्व सदस्यांशी चांगला संवाद साधत नवी प्रेरणा मिळवली. यामध्ये मी कुटुंब व सामाजिक काम यामध्ये नवे संतुलन मिळवले. देवपूजेसाठी मी आता अधिक वेळ देत आहे. त्यातून मला मनाची शांती मिळते आहे. 
आधी मी व्यायामाला फारसे महत्व दिले नव्हते. माझ्या वसाहतीमध्ये  वॉक नियमित सुरु केला. त्याची सवय मला आता लागली आहे. त्यामुळे ताजेतवाणे पणा वाढला आहे. त्यासोबत आहारामध्ये देखील बदल केले आहेत. तुळशीचा काढा, हळदीचे दूध, लिंबू पाणी यासारखे इम्युनिटी वाढवणारे पदार्थ मी नियमित आहारात वाढवण्याचे ठरवले आहे. बाहेरचे जेवण बंद झाल्याने मला ऍसिडिटी पासून मिळालेली मुक्तता मी कायम ठेवणार आहे. गीतापाठाची नियमितता देखील नव्या वर्षात ठेवणार आहे. आरोग्याच्या बाबतीत व्यायाम वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच सकाळी साडे दहा वाजेपर्यंत मी कुटुंब व वैयक्तीक बाबीसाठी वेळ देण्याचे निश्‍चित केले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning Walk and Inclusion of Immunosuppressants in the Diet: Health Resolution by CA Raj Miniar