सांगोला तालुक्‍यातील सिंचनाचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे खा.पवारांनी दिले आश्‍वासन 

sharad pawar.jpg
sharad pawar.jpg

सांगोला(सोलापूर) : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार गुरुवार (ता. 12) नोव्हेंबर रोजी आटपाडी तालुक्‍यातील खानजोनवाडी येथील डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांची सांगोल्यातील राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील, विजयदादा येलपले यांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी तालुक्‍यातील रखडलेल्या सिंचन योजना व शेतीच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर खा. शरद पवार यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा केली. याबाबत तात्काळ जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक लावून सांगोला तालुक्‍यातील सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील यांनी दिली.

यावेळी सोबत तासगावच्या आमदार सुमनताई पाटील व पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 


दर्जेदार डाळिंब उत्पन्नासाठी देशात प्रसिद्ध असणाऱ्या सांगोला तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना रखडलेल्या सिंचन योजनांमुळे पाणीटंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन दिपक साळुंखे-पाटील यांनी म्हैसाळ योजनेतुन तालुक्‍यातील पारे तलाव, हंगिरगे तलाव, जवळा तलाव भरून द्यावा. तसेच गळवेवाडी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून कोरडा व माण नदीवरील सर्व को.प.बंधारे, लहान-मोठे पाझर तलाव त्वरीत भरुण देण्यात यावेत. म्हैसाळ योजनेत वाकी घे., वाणीचिंचाळे, आलेगांव खालील बाबरवाडी , मेडशिंगी, बुरलेवाडी आणि राजापुर या गावांचा समावेश करण्यात यावा. 

टेंभू योजनेमध्ये सांगोला तालुक्‍यातील मानेगांव, डोंगरगांव, खवासपूर, लोटेवाडी (नवी-जुनी), सोनलवाडी, बागलवाडी, लिगाडेवाडी, अजनाळे, वझरे, या वंचित गांवाचा समावेश करण्यात यावा. बुध्देहाळ प्रकल्पाचाही टेंभू योजनेमध्ये समावेश करण्यात यावा, बुध्देहाळ प्रकल्प अंतर्गत बुध्देहाळ, पाचेगांव खु., सोमेवाडी, चोपडी, उदनवाडी, बलवडी, नाझरे या गांवाना त्याचा मोठा फायदा हाईल. टेंभू योजनेतुन कि.मी.47.900 वरील फाट्यातून वाटंबरे पाझर तलाव क्रंमांक 3 मध्ये 18 इंची बंद पाईपलाईन करुन पाणी देण्यात यावे. कवठेमहाकांळ कॅनाल वरील पाचेगांव बु. ते कोळा ते गौडवाडी ते बुध्देहाळ तलावास मिळणारा नाला यालाकॅनालचा दर्जा द्यावा, किडबिसरी ते कोंबडवाडी कोळा नाला याला कॅनालचा दर्जा द्यावा, सांगोला कॅनाल वरील कोळा नाला ते बुध्देहाळ तलावास कॅनालचा दर्जा मिळावा, जुनोनी तलाव तिप्पेहळळी ते जुनोनी तलाव ते हातीद बेलवण नदी जुजारपूर ते हातीद बेलवण नदीला कॅनालचा दर्जा देण्यात यावा. 
नीरा उजवा कालवा विभाग फलटण अंतर्गत कि.मी. 0 ते मैल 93 पर्यंत कॅनालमधुन बंद पाईपलाइनद्वारे सांगोला व पंढरपूर तालुक्‍याला पाणी देण्यात यावे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. चिंचोली तलाव हा निरा उजवा कालव्याला टेल टॅंक म्हणुन जाहीर करुन तो नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने भरुन देण्यात यावा. उजनी धरणामध्ये सांगोला तालुक्‍याच्या वाट्याचे 2 टीएमसी पाणी आरक्षित आहे. सदरचे पाणी इस्त्रायल देशाच्या धरतीवर बंद पाईपलाईनमधुन दसुर (टॅंक) बंधाऱ्याजवळ आणून तेथुन तालुक्‍यामध्ये हे पाणी येणे शक्‍य आहे. यामुळे तालुक्‍यातील पाण्यापासुन वंचीत असलेल्या गांवाचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. इटकी, कटफळ, अचकदाणी, लक्ष्मीनगर, चिकमहुद, बंडगरवाडी, नरळेवाडी (वाकी), या गावांअर्तगत येणाऱ्या वाड्या-वस्त्या मिळुन या गांवातील शेतकरी पाण्यापासुन वंचित आहेत. 
या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राजेवाडी तलावाचा उरमोडी आणि जिहे कठापूर सिंचन प्रकल्पामध्ये समावेश करावा आणि वंचीत गांवासाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध करावे. तालुक्‍यातील नद्यांना कॅनॉलचा दर्जा देऊन विविध सिंचन योजनांतून या नद्यांना वर्षातून किमान आठ महिने पाणी सोडावे अशा शेती आणि पाण्यासंदर्भात विविध मागण्या माजी आमदार दिपक साळुंखे पाटील व शिष्टमंडळाने माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे केल्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com