मुंबई-पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल्वे विद्युतीकरण कामाची होणार सुरुवात 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 28 October 2020

यामध्ये सर्वेक्षण, आयडिटीफिकेशन ऑफ ओव्हर हेड, ओव्हर ग्राऊंड, अंडरग्राऊंड, युटीलीटीज आदीच्या बाबतीत निवीदा मागवल्या आहेत. तसेच आयडिटीफिकेशन ऑफ पॉवर ऍट सबस्टेशन असेही कामाचे स्वरुप त्यामध्ये नोंदवले आहे. त्यामध्ये प्राधान्याने या रेल्वेच्या संदर्भात विद्युतीकरणाच्या कामासाठी उपलब्ध असलेल्या मुलभूत सुविधाची पाहणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी वीज पुरवठा योग्य प्रमाणात कसा मिळु शकेल. या मार्गावर उपलब्ध असलेल्या स्थानकाच्या दरम्यान वीज पुरवठ्याचे स्त्रोत निश्‍चित केले जातील. 

सोलापूरः नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन च्या वतीने मुंबई-पुणे-हैदराबाद या हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी विद्युतीकरण करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण व इतर कामासाठी निविदा काढल्या आहेत. 

हेही वाचाः दिवाळीच्या तोंडावर तीन महिन्याचे वेतन नाही : आंदोलनाची तयारी सुरू 

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने याबाबत आज निविदा काढल्या आहेत. त्यामध्ये मुंबई-पुणे-हैदराबाद हाय स्पीड रेल्वेच्या प्रकल्पाच्या संदर्भाने निविदा सुचना जारी केल्या आहेत. यामध्ये अनेक प्रकारच्या कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. 

हेही वाचाः मकाई कारखाना वाचवण्यासाठी आदिनाथ कारखाना ठेवला गहाण ; कृती समितीचा बैठकीत आरोप 

यामध्ये सर्वेक्षण, आयडिटीफिकेशन ऑफ ओव्हर हेड, ओव्हर ग्राऊंड, अंडरग्राऊंड, युटीलीटीज आदीच्या बाबतीत निवीदा मागवल्या आहेत. तसेच आयडिटीफिकेशन ऑफ पॉवर ऍट सबस्टेशन असेही कामाचे स्वरुप त्यामध्ये नोंदवले आहे. त्यामध्ये प्राधान्याने या रेल्वेच्या संदर्भात विद्युतीकरणाच्या कामासाठी उपलब्ध असलेल्या मुलभूत सुविधाची पाहणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी वीज पुरवठा योग्य प्रमाणात कसा मिळु शकेल. या मार्गावर उपलब्ध असलेल्या स्थानकाच्या दरम्यान वीज पुरवठ्याचे स्त्रोत निश्‍चित केले जातील. 
ही कामे केवळ 112 दिवसात पूर्ण करावयाची असल्याची मुदत या निविदामध्ये देण्यात आली आहे. 
सध्या मध्य रेल्वेकडून या मार्गाचे रुपांतर हाय स्पीड मध्ये रुपांतरीत करण्यासाठी अनेक प्रकारची कामे मागील चार ते पाच महिन्यापासून केली जात आहे. त्यासाठी सध्या असलेली तांत्रिक क्षमतांचा विस्तार केला जात आहे. त्यामध्ये मुख्य लाईन, स्थानके व उपलब्ध असलेल्या इतर तांत्रीक बाबीची तपासणी केली जात आहे. तसेच त्याबाबत उपलब्ध तांत्रिक गोष्टीचे अपग्रेडेशन केले जात आहे. सध्याच्या मार्गावर 160 कीमी प्रति तास वेगाने हाय स्पीड रेल्वे धावण्याच्या दृष्टीने ही कामे सुरू आहेत. याच प्रकल्पाचे विद्युतीकरण करण्यासाठी आता हाय स्पीड रेल्वे कॉपोरेशनने या निविदा काढल्या आहेत. हाय स्पीड रेल्वेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. कॉर्पोरेशनच्या अहमदाबाद मुख्यालयाकडून या निविदा काढल्या आहेत. या सर्व कामांना आता हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या सहभागाने अधिक गती येणार असल्याचे मानले जाते.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Pune-Hyderabad high speed railway electrification work will begin