दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांना तीन महिन्याचे वेतन नाही : आंदोलनाची तयारी सुरू 

प्रकाश सनपूरकर
Tuesday, 27 October 2020

कामे सुरू झाल्यानंतर मागील तीन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. दसऱ्याचा सण विना वेतनाचा साजरा करण्याची वेळ या कामगारावर आली. त्यानंतर आता पंधरा दिवसावर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे वेतनासाठी कर्मचारी व कामगार आक्रमक झाले आहेत. 
दरम्यान, या प्रश्‍नावर आता एसटी कामगार संघटनेने आंदोलनाची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात ता. 2 नोव्हेंबर रोजी खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन वेतनाच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचे ठरले. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास ता. 9 नोव्हेंबर रोजी आक्रोश आंदोलन करण्याची तयारी चालवली आहे. कर्मचारी त्यांच्या कुटुंबियासह या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

सोलापूरः मागील तीन महिन्यापासून एसटी सेवा सुरु झाल्यानंतर देखील एसटी खात्याकडून कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळालेच नाही. काम चालू पण वेतन नाही अशा स्थितीत दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. वेतन नाही तर दिवाळीचा सण कसा साजरा करावा या चिंतेत सापडलेले एसटी कामगार व कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत. 

हेही वाचाः कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावरील प्रभाग 

प्रवाशी सेवा बंद असली तरी या कर्मचाऱ्यांनी कोरोना संकटात वाहतूक करून ही सेवा बजावली. तसेच माल वाहतुकीच्या व्यवसायात उतरून उत्पन्न वाढीचे प्रयत्न केले. कोरोना लॉकडाउन नंतर एसटी सेवा सुरू झाल्या. आंतरजिल्हा व नंतर बाहेरील जिल्ह्यासाठी एसटी गाड्या सुरू झाल्या आहेत. पण प्रवाशांचा प्रतिसाद आता वाढत चालला आहे. सर्वत्र वाहतूक सुरु झाल्याने एसटीचे चालक, वाहक व कर्मचारी देखील कामाला लागले. 

हेही वाचाः जो कारखाना तोड देईल त्यालाच ऊस देणार ! शेतकरी वर्ग झाला सतर्क 

कामे सुरू झाल्यानंतर मागील तीन महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. दसऱ्याचा सण विना वेतनाचा साजरा करण्याची वेळ या कामगारावर आली. त्यानंतर आता पंधरा दिवसावर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे वेतनासाठी कर्मचारी व कामगार आक्रमक झाले आहेत. 
दरम्यान, या प्रश्‍नावर आता एसटी कामगार संघटनेने आंदोलनाची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात ता. 2 नोव्हेंबर रोजी खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन वेतनाच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचे ठरले. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास ता. 9 नोव्हेंबर रोजी आक्रोश आंदोलन करण्याची तयारी चालवली आहे. कर्मचारी त्यांच्या कुटुंबियासह या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 
दरम्यान, एसटी कामगार संघटनेचेने नेते हनुमंत ताटे व इतर पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समवेत विशेष बैठक बोलावण्याची तयारी सूरू झाली आहे. शासनाकडून या प्रश्‍नी योग्य तोडगा आंदोलन सुरू होण्यापुर्वी काढला जावा असे प्रयत्न सध्या सुरू आहेत. 

सोलापूर विभागाचा प्रश्‍न 
- एकूण कर्मचारी 4200 
- महिन्याचे वेतन 10 कोटी रुपये 
- एकुण थकीत वेतन 30 कोटी रुपये 
- राज्यातील कर्मचाऱ्याचे वेतन 250 कोटी रुपये 

आंदोलनापुर्वी प्रश्‍न सुटावा 
संघटनेकडून वेतनाचा प्रश्‍न सोडवण्यासाटी प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीचा सण समोर असल्याने कर्मचारी व कामगारांना वेतन मिळणे आवश्‍यक आहे. संघटनेचने आंदोलनाची तयारी केली आहे-. 
- संतोष जोशी, अध्यक्ष एसटी कामगार संघटना, सोलापूर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST workers do not get three months salary on the eve of Diwali: Preparations for agitation begin