ग्रामपंचायत निवडणुकीत विरोध केल्यावरून मंगळवेढा तालुक्‍यात तलवारीने खुनी हल्ला 

Murder attack with sword in Mangalwedha taluka after oppos in Gram Panchayat elections
Murder attack with sword in Mangalwedha taluka after oppos in Gram Panchayat elections

सलगर बुद्रुक (सोलापूर) : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन राम बाबासाहेब ओलेकर (रा सलगर खुर्द, ता. मंगळवेढा) यांना शिवीगाळ करत तलवार डोक्‍यात मारल्याप्रकरणी सलगर खुर्दच्या सरपंच, सरपंच सुपुत्र यांच्यासह सहा जणांविरूद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज सकाळी 8.30 च्या सुमारास सलगर खुर्द येथे घडली आहे. 

सरपंच सुपुत्र विठ्ठल शामराव सरगरव, दत्ता शामराव सरगर, विद्यमान सरपंच सुरावंती शामराव सरगर, गजेंद्र वसंत सरगर, गौतम बंडगर, सचिन मासाळ (सर्व रा. सलगर खुर्द, ता. मंगळवेढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत राम बाबासाहेब ओलेकर (रा सलगर खुर्द, ता. मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली आहे. 

आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास सलगर खुर्द येथील फिर्यादीची बहिण मिराबाई धुळाप्पा करपे हिच्या घरासमोर मिराबाई करपे व भाऊसाहेब लेंगरे यांच्यामध्ये सांडपाण्याच्या कारणावरून सुरु असलेल्या भांडणामध्ये फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा तानाजी बहिण, भाचा असे समजावून सांगत असलाना सरपंच पुत्र विठ्ठल शामराव सरगर याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन त्यांना शिवीगाळ करत हातातील तलवारीने तु विरोधी गटाचे काम करतो. इथे कशाला आला तुला, दसरा सण बघू देत नाही, असे म्हणून फिर्यादीच्या डोकीत मारुन गंभीर जखमी केले. तसेच सोबतच्या लोकांनी काठीने फिर्यादीची बहिण मिराबाई , भाचा सुरेश व मुकेश यांना मारहाण केली आहे. तसेच फिर्यादीचा मुलगा तानाजी हा भांडणाची व्हीडिओ शुटींग करीत असताना दुसरा सरपंच पुत्र दत्ता शामराव सरगर याने हातात तलवार घेवून त्याचा पाठलाग केला. दरम्यान, सर्वांनी फिर्यादीच्या बहिणीच्या घरावर दगडफेक करुन फिर्यादीच्या मोटार सायकलची मोडतोड करुन नुकसान केले आहे. 

याप्रकरणी सरपंच पुत्र विठ्ठल शामराव सरगर व दत्ता शामराव सरगर, सुरावंती शामराव सरगर, गजेंद्र वसंत सरगर, गौतम बंडगर, सचिन मासाळ (सर्व रा.सलगर, खुर्द ता. मंगळवेढा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खटके हे करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com