#Crime : संशयावरून तेलगाव सीनामध्ये तरुणाचा खून 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 एप्रिल 2020

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून रामहरी याने युवराज याच्यासोबत बुधवारी सायंकाळी घरासमोर भांडण केले. चाकूने वार केले. दगडाने मारून गंभीर जखमी केले. या घटनेत युवराजचा मृत्यू झाला. 

सोलापूर : पत्नीसोबतच अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तेलगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील तरुणाचा चाकूने वार करून, दगडाने मारून खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या प्रकरणात संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

#Coronavirus : घरात थांबा..! हे पोलिसांनी सांगायची गरजच काय?

युवराज निवृत्त लांडगे (वय 29, रा. तेलगाव सीना, ता. उत्तर सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रामहरी श्‍यामराव बनसोडे (वय 29, रा. तेलगाव सीना, ता. उत्तर सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून रामहरी याने युवराज याच्यासोबत बुधवारी सायंकाळी घरासमोर भांडण केले. चाकूने वार केले. दगडाने मारून गंभीर जखमी केले. या घटनेत युवराजचा मृत्यू झाला. 

#Solapur : आग टाळण्यासाठी विमानतळावर प्रतिबंधात्मक उपाय

घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक प्रभाकर शिंदे, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयित रामहरी यास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक चौकशी चालू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगताप यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in solapur