#Solapur : आग टाळण्यासाठी विमानतळावर प्रतिबंधात्मक उपाय 

#Solapur : आग टाळण्यासाठी विमानतळावर प्रतिबंधात्मक उपाय 

सोलापूर : गवताला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सोलापूर विमानतळ प्रशासनाने विमानतळ परिसरातील गवत टप्प्याटप्याने जाळून प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सुरवात केली आहे. तीन दिवसांपूवी विमानतळावरील गवताला लागलेल्या आगीच्या घटनेमुळे थेट दिल्लीहून विचारणा झाल्याने आता उपाययोजना करण्यात येत आहेत. 

#Coronavirus : स्वत:ची, कुटुंबीयांची काळजी घेत पोलिस ड्यूटीवर सज्ज! - 

सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या प्रश्‍नामुळे सोलापूर विमानतळ सध्या बंदच आहे. याबाबत न्यायालयीन लढा सुरू आहे. अशातच विमानतळ परिसरातील गवताला वारंवार आग लागल्याच्या घटना घडत आहेत. तीन दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी रात्री 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिवे लावल्याचे आवाहन केले होते, तेव्हा काही अतिउत्साही लोकांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली होती. विमानतळ परिसरातील नागरी वसाहतीमधून उडालेल्या फटाक्‍यामुळे गवताला पुन्हा एकदा आग लागली होती. 

#Lockdown : मित्रांसोबत पोलिस जीपमध्ये पार्टी! चौघांवर गुन्हा; पोलिस निलंबीत

या आगीच्या घटनेची बातमी स्थानिक माध्यमांसह देशभरातील माध्यमांमधून प्रसिद्ध झाली. त्यानंतर दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापूर विमानतळ कार्यालयास विचारणा करून तत्काळ उपाय करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बुधवारी सकाळपासून विमानतळ परिसरातील गवत टप्याटप्याने जाळून उपाय करण्यात येत आहे. सोलापूरच्या अग्निशमन दलाच्या मार्गदर्शनाखाली ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे व्यवस्थापक संतोष कौलगी यांनी सांगितले. 

जगभर चर्चा झाल्यानंतर विमानतळातील आगप्रकरणी गुन्हा दाखल 
विमानतळावरील गवताला आग लागल्याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास सोलापूर विमानतळ परिसरातील मुख्य इमारतीजवळील मैदानात घडली होती. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता घराच्या परिसरात दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी काही लोकांनी फटाके उडवून आतषबाजी केल्याचे समोर आले होते. विमानतळ परिसरातील नागरी वसाहतीतून उडवलेला फटाका सोलापूर विमानतळ येथील मुख्य इमारतीच्या जवळील मोकळ्या जागेतील गवतावर पडला. त्यामुळे आग लागून नुकसान झाले. या आगीमुळे रन वे आणि शेजारील लायटिंग यंत्रणा, मुख्य इमारतीला आग लागून नुकसान होण्याचा तसेच विमानतळ येथे कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना दुखापत होण्याची शक्‍यता होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सोलापूर विमानतळ येथील रन वेच्या परिसरात आलेल्या गवताला नेहमीच आगीच्या घटना घडत आहेत. याबाबत आम्ही पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टप्याटप्याने गवत जाळण्यात येत आहे. 
- संतोष कौलगी, 
व्यवस्थापक,
सोलापूर विमानतळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com