अबब...सोलापुरात मटनाचा किलोचा भाव पोचला.....

अबब...सोलापुरात मटनाचा किलोचा भाव पोचला.....

सोलापूर : मटन मांसाहारी खवय्याचा जिव्हाळ्याचा विषय. झणझणीत रश्श्यासह मटनाचा आस्वाद म्हणजे तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात लॅाकडाऊन आहे. त्यातच आता मटनाचे भावही वाढले आहेत.

अनेक दुकानांसमोर रांगा लागल्या
कोरोना विषाणू संसर्गामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यात संचारबंदी आहे. त्यामुळे जनजीवन  विस्कळीत झाले आहे. मांस-मटनासह जीवनावश्यक वस्तु विक्रीस शासनाने परवानी दिल्याने रविवारी शहरातील मटन दुकांनासमोर रांगा लागल्या होत्या. त्यातच अंतर ठेवायच्या सूचनेमुळे या रांगा लांब पर्यंत गेल्याच दिसून आले. 

सरासरी वाढ
सरासरी 550 ते 580 रुपये किलोने मिळणारे मटनाचे भाव रविवारी 600 ते 650 रुपये किलोपर्यंत गेले होते. पूर्वी ज्या दुकानात 550 रुपये किलो मटन मिळायचे त्यांनी थेट 600 ते 650 रुपयांपर्यंत भाव वाढवले होते. 

दोन तासांत  60-80 किलो मटनाची  विक्री
सोलापूर शहरातील विविध दुकानांमध्ये सकाळी दोन तासांत सरासरी प्रत्येकी 60 ते 80 किलो मटनाची विक्री झाली. अनेक दुकानातून ग्राहकांना परत जावे लागले किंवा त्यानी पर्याय म्हणून चिकनची खरेदी केली.

चिकनच्या तुलनेत मटनाला आज भरपूर मागणी होती. आम्ही पूर्वी 580 रुपये किलोने मटन  विकायचो, आज 600 रुपये किलोने विकले.
-अशपाक शेख, विक्रेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com