अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा प्रश्न सोडवणार : नानासाहेब पटोले 

शांतिलाल काशीद 
Saturday, 29 August 2020

लॉकडाउन काळात उपासमार होत असल्याने कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शिक्षकांवर दारोदारी फिरून माळवे विकण्याची वेळ आली तर कोणावर मजुरी करण्याची वेळ आली. हे भीषण वास्तव व भयावह परिस्थिती कृती समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आमदार बाळाराम पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार किशोर दराडे यांची भेट घेऊन मांडली. त्यावर आमदारांनी या मागण्या खासदार शरद पवार, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मांडल्या.

मळेगाव (सोलापूर) : राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन 2003 ते 2019 मधील शिक्षकांच्या वाढीव पदांना वेतन अनुदानासह मंजुरी देण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. 27) दुपारी दोन वाजता विधान भवनातील दालन क्रमांक 42 मध्ये बैठक झाली. या वेळी अनुदानित शिक्षकांचा प्रश्न लवकरच निकाली काढू, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुदानित कृती समितीचे कार्याध्यक्ष प्रा. पंडित सातपुते (सोलापूर) यांनी दिली. 

हेही वाचा : तीन दिवसांच्या कलाकारांची पाठ यंदा कोण थोपटणार? सजीव देखाव्यांअभावी पूर्वभागात सन्नाटा 

या वेळी आमदार दत्तात्रय सावंत, आमदार बाळाराम पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, शासकीय अधिकारी व कृती समितीचे अध्यक्ष सचिन चव्हाण, कार्याध्यक्ष पंडित सातपुते, उपाध्यक्ष अशोक हिंगे, लहू महाजन, मीना सूर्यवंशी उपस्थित होते. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वाढीव/प्रस्तावित पद कृती समितीने राज्यभर अनेकदा लक्षणिक उपोषण व आंदोलने केली. तसेच आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण करीत शासनाचे लक्ष देखील वेधले. लॉकडाउन काळात मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोन वेळा घरात बसून उपोषण केले. लॉकडाउन काळात उपासमार होत असल्याने कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शिक्षकांवर दारोदारी फिरून माळवे विकण्याची वेळ आली तर कोणावर मजुरी करण्याची वेळ आली. हे भीषण वास्तव व भयावह परिस्थिती कृती समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, आमदार बाळाराम पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार किशोर दराडे यांची भेट घेऊन मांडली. त्यावर आमदारांनी या मागण्या खासदार शरद पवार, विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मांडल्या. 

हेही वाचा : राजकीय आडोशाला खाकीचा गोरख धंदा! "या' शहरात 15 दिवसांत चार पोलिस निलंबित 

याबाबत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली व लवकरच प्रश्न सोडवून शिक्षकांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे टेबलावर पडून राहिलेल्या शिक्षकांच्या फाइलला गती मिळाली. विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी तत्काळ शिक्षकांच्या भावना व मागण्यांची दखल घेत विधान भवनात गुरुवारी शिक्षकांच्या प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन केले. त्यात शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी शिक्षकांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लावावा यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सोबतच अमरावतीचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, पुणे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी विधी मंडळात विचारलेल्या प्रश्नावर संबंधित विभागाने तत्काळ निर्णय घ्यावा, असे आदेश श्री. पटोले यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच राज्यातून शिक्षकांच्या संदर्भात आलेले सर्व प्रश्न व मागण्यांची माहिती मागविली. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पदांचा प्रश्न लवकरच निकाली काढू ,असे आश्वासन शिक्षक आमदार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanasaheb Patole assured to solve the problem of subsidized junior college teachers