दिवाळीसाठी नांदेड-पनवेल-नांदेड विशेष रेल्वे फेरीला सुरवात 

प्रकाश सनपूरकर
Friday, 23 October 2020

नांदेड-पनवेल फेस्टिवल ही विशेष गाडी दररोज नांदेड स्टेरशनवरून 17.30 वाजता सुटणार आहे. ही गाडी पुर्णा (सायं.18.06), परभणी (18.30),गंगाखेड ( 19.14), परळी वैजनाथ (20.15), लातुर रोड (21.00), लातुर (22.55), उस्मानाबाद (00.18), कुर्डुवाडी( 02.00), दौण्ड जं.(04.45), पुणे जं.(06.15), चिंचवड (06.39), तळेगांव (06.54), लोनावळा(07.20), व पनवेलला सकाळी 9 वाजता पोहोचेल. 

सोलापूरः प्रवाशांची वाढती अतिरिक्त गर्दी लक्षात धेऊन रेल्वे प्रशासनाव्दारे नांदेड-पनवेल-नांदेड फेस्टिवल विशेष गाडी आजपासून सोडण्यात येत आहे. ही गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत दररोज प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. 

हेही वाचाः महिलांतील रोगावर वार करणारी दुर्गा डॉ.अर्चना खरे 

नांदेड-पनवेल फेस्टिवल ही विशेष गाडी दररोज नांदेड स्टेरशनवरून 17.30 वाजता सुटणार आहे. ही गाडी पुर्णा (सायं.18.06), परभणी (18.30),गंगाखेड ( 19.14), परळी वैजनाथ (20.15), लातुर रोड (21.00), लातुर (22.55), उस्मानाबाद (00.18), कुर्डुवाडी( 02.00), दौण्ड जं.(04.45), पुणे जं.(06.15), चिंचवड (06.39), तळेगांव (06.54), लोनावळा(07.20), व पनवेलला सकाळी 9 वाजता पोहोचेल. 

हेही वाचाः तेलुगु भगिनींचा आवडत्या ब्रतुकम्मा सणाची अख्यायिका 

तर पनवेल ते नांदेड फेस्टिवल विशेष गाडी शनिवार (ता.24) पासून धावणार आहे. ही गाडी दररोज पनवेल स्थानकावरून सायंकाळी 16.00 वाजता निघेल. ही गाडी लोनवळा ( 17.52) तळेगांव( 18.19) चिंचवड (18.39), पुणे जं.आगमन (19.45), दौण्ड जं.आगमन (21.05), कुर्डुवाडी (22.55), उस्मानाबाद (00.42), लातुर (02.30), लातुर रोड (03.20), परळी वैजनाथ (05.40), गंगाखेड(06.19), परभणी (07.28), पुर्णा (08.05) मार्गे नांदेडला सकाळी 09.25 वाजता पोहचेल. सदर गाडीस 21 कोचेस असणार आहेत. वरिल फेस्टिवल विशेष गाडीचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded-Panvel-Nanded Festival railway ferry begins