होटगी तलावात जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांची निसर्गप्रेमींनी केली सुटका 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 6 December 2020

वाईल्डलाइफ कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे सदस्य रत्नाकर हिरेमठ, ऋतुराज कुंभार, अजय हिरेमठ, विनय गोटे, अभिषेक कुलकर्णी, रोहन सरडे हे होटगी तलाव येथे पक्षी निरीक्षण व फोटोग्राफीसाठी गेले होते. त्या परिसरात प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला. या तलावाच्या परिसरामध्ये अनेक पक्षी शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेले दिसले. 

सोलापूरः होटगी तलाव परिसरात पक्ष्यांसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून टिटवी, पानकावळा, हळदी-कुंकू आदी चार पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निसर्ग प्रेमी कार्यकर्त्यांनी तलावात टाकलेली जाळी कापून चार पक्ष्यांची सुटका केली. 

हेही वाचाः व्यायामसाठी सायकल पुन्हा ट्रेंडमध्ये ; ग्रामीण भागातही वाढला वापर 

वाईल्डलाइफ कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे सदस्य रत्नाकर हिरेमठ, ऋतुराज कुंभार, अजय हिरेमठ, विनय गोटे, अभिषेक कुलकर्णी, रोहन सरडे हे होटगी तलाव येथे पक्षी निरीक्षण व फोटोग्राफीसाठी गेले होते. त्या परिसरात प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला. या तलावाच्या परिसरामध्ये अनेक पक्षी शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेले दिसले. 

हेही वाचाः सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणाले, धुळीमुळे वाढेल कोरोना! प्रदूषण मंडळाचे महापालिकेस पत्र 

शिकारीच्या जाळ्यात अडकलेले पक्षी जीव वाचवण्यासाठी तडफड करत होते. तेव्हा या सदस्यांनी लगेच पाण्यात उतरुन जाळे कापले आणि पक्ष्यांची सुटका केली. वंचक, उघड्या चोचीचा करकोचा, रातबगळा, कांडेसर या पक्ष्यांनी सुटकेनंतर आकाशात गगनभरारी घेतली. 
टिटवी, पाणकावळा, हळदी कुंकू व मुंगूस आदी मात्र जाळ्यात अडकून मृत्यू पावल्याचे दिसून आले. वन विभागास माहिती देऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी वन्यजीव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद शेटे, फाउंडेशनचे सदस्य संतोष धाकपाडे उपस्थित होते. मच्छीमारांना मासेमारीसाठी परवानगी दिली असताना दुर्देवाने त्यामध्ये काही जण पक्ष्यांची शिकार करतात की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nature lovers rescue birds trapped in Hotgi Lake