करमाळ्यात खासगी डाॅक्टरांनी कोविड सेंटर सुरू करण्याची गरज 

अण्णा काळे
Tuesday, 22 September 2020

करमाळा तालुक्‍यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी करमाळा तहसील कार्यालयात तालुक्‍यातील अधिकारी व डॉक्‍टरांची बैठक घेतली या बैठकीत या सुचना देण्यात आल्या आहेत. 

करमाळा(सोलापूर): करमाळा शहरातील खासगी डॉक्‍टरांनी तात्काळ कोविंड सेंटर सुरू करावे किंवा प्रत्येक हॉस्पीटल मध्ये कोविड साठी राखीव बेड ठेवावेत अशा सुचना प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिल्या आहेत. 

हेही वाचाः स्मार्ट सिटी सीईओचा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला राजीनामा 

करमाळा तालुक्‍यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी करमाळा तहसील कार्यालयात तालुक्‍यातील अधिकारी व डॉक्‍टरांची बैठक घेतली या बैठकीत या सुचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचाः कुरनूर धरणात पाणी साठा पोहोचला पन्नास टक्‍क्‍यांवर 

यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी ज्योती कदम म्हणाल्या, करमाळा शहरात खासगी डॉक्‍टरांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ठराविक बेड राखीव किंवा सर्व डॉक्‍टरांनी विचारविनिमय करून एक हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवावे. डॉक्‍टरांनी तात्काळ निर्णय करून रुग्णांसाठी सोय करणे गरजेचे आहे . 
या बैठकीला तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, मुख्यधिकारी वीना पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड ,खाजगी हॉस्पीटलचे डॉक्‍टर प्रतिनीधी डॉ.प्रमोद कांबळे, डॉ.संदेश शहा, 
डॉ.रविकिरण पवार, डॉ.अविनाश घोलप,डॉ.पाटील, डॉ.शहा उपस्थित होते. 

खासगी डॉक्‍टरांनी विचार करावा 
करमाळा शहरात व तालुक्‍यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.शासनाच्या वतीने सुरू केलेली कोविंड सेंटर कमी पडू लागली आहेत. त्यामुळे खासगी डॉक्‍टरांनी कोविंड सेंटर सुरू करण्याबाबत योग्य त्या सूचना दिले आहेत या सूचनांची डॉक्‍टरांनी अंमलबजावणी करावी अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. 
- समीर माने,तहसीलदार करमाळा 

असोसिएशनचे प्रयत्न 
करमाळ्यात कोवीड साठी सुविधा उपलब्ध करणे शक्‍य नाही. सिटीस्कॅन बंद असल्याने खुप अडचणी येत आहेत. करमाळा तालुका डॉक्‍टर्स असोसिएशनच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. परंतू तांञिक अडचणीमुळे अडचणी येत आहेत. 

- डॉ.रविकिरण पवार,करमाळा. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need for private doctors to start Kovid Center in Karmala