नेपाळ पर्यटनाचे आकर्षण पशुपतिनाथ आणि लुम्बिनी भेट

प्रकाश सनपूरकर
Sunday, 27 September 2020

अनेक दिवसापासून मनात एकच विचार चालू होता आपण नेपाळ देश कधी पाहणार आणि एकटे प्रवास कसा करणार असे अनेक प्रश्न मनात गोधळ घालत होते. प्रेक्षणीय स्थळ पाहायचे असेल तर रेल्वे ने उत्तम होईल असे ठरवले. प्रवास तसा सोलापुरातून सुरु झाला तो सोलापूर ते वाराणसी (बनारस) प्रवास केला.

सोलापूरः सुंदर देखणे काठमांडू, पशुपतीनाथांचे मंदिर व लुंबिनी येथील तथागत गौतम बुध्दांचे जन्मस्थान या प्रकारच्या स्थळांना भेट देऊन नेपाळ पर्यटनाचा आनंद घेता येतो. अगदी सहज रस्ता, सोपे नियम यामुळे नेपाळची भेट आनंददायी असते. 

हेही वाचाः माझी रायगडवारी 

नेपाळला पर्यटक म्हणून दिलेल्या भेटीचा अनुभव प्रा. गणेश चन्ना यांनी व्यक्त केला. 

हेही वाचाः गेंटुआ लाडू, नम्रतेमधील श्रीमंती आणि रंगारंग लोककलेचा आनंद 

अनेक दिवसापासून मनात एकच विचार चालू होता आपण नेपाळ देश कधी पाहणार आणि एकटे प्रवास कसा करणार असे अनेक प्रश्न मनात गोधळ घालत होते. प्रेक्षणीय स्थळ पाहायचे असेल तर रेल्वे ने उत्तम होईल असे ठरवले. प्रवास तसा सोलापुरातून सुरु झाला तो सोलापूर ते वाराणसी (बनारस) प्रवास केला. प्रथम गंगा स्नान त्यानंतर काशी विश्वेश्वराचे दर्शन आणि गंगा आरती ने मन प्रसन्न झाले. सकाळी गोरखपूर ते सलोनी (भारत देशाची सीमा) हा प्रवास केला. तेथून नेपाळ देशाच्या भैरवा सीमा लागते कारण तेथील सुरक्षा बलाकडून तपासणी केली जाते. याच सीमेवर भारतीय चलन बदलता येते म्हणजे भारतीय चलनाचे तुम्ही नेपाळी चलना मध्ये रुपांतर करू शकतो. नेपाळ मध्ये तसे पासपोर्ट ची गरज लागत नाही तुमच्या कडे कोणतेही एखादे भारतीय ओळख पत्र असेल तर चालते जसे आधार कार्ड ई. 
येथून आमचा तसा भैरवा ते काठमांडू प्रवास सुरु झाला. रस्ता पूर्णपणे डोंगराळ भाग असल्याने वेळ लागतो. घनदाट जंगल, अनेक वळणे रस्ते, सुंदर परिसर आणि कलात्मक रित्या तयार केलेले अनेक सुंदर राहती घरे यामुळे काठमांडू कधी आले ते समजलेच नाही. गांधी शांतता समितीचे अध्यक्ष लालबहादूर राणा यांनी आमच्या सर्वांचे स्वागत केले. 
गांधी शांतता समितीच्या वतीने दिवसीय आंतरराष्ट्रीय शांतता राजदूत संमेलनासाठी भारत, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, लंडन, बांग्लादेश, श्रीलंका, भूतान, इंडोनेशिया, फ्रांस इ. देशाच्या राजदुतांची उपस्थिती होती. 
तेथील काही स्थळांना भेट दिली त्यातील एक होते बुद्धांची मंदिरे सुंदर असे मंदिर आणि त्यांची रचना उत्तम होती. कारण होते माझा मित्र कारचुंग यांने मला घेवून अनेक ठिकाणे त्यांनी दाखवली. माझ्या मित्राच्या बहिणीने नेपाळी पद्धतीचे अशी अनेक प्रकारचे पदार्थ मी जेवणात पाहिले. त्यांना मी दिलेली सोलापुरी शेंगा चटणी देखील आवडली. 
संध्याकाळी दरबार मंडप आणि कुमारी मंदिर येथील सागवानी लाकडामध्ये कोरलेले कलाकृती फारच सुंदर आणि मनाला भुरळ घालणारे होते. त्यानंतर त्या परिसरातील अनके लाकडी इमारती आणि पुरातन मंदिरांना भेट दिले. 
काठमांडूतील अत्यंत महत्वाचे ठिकाण म्हणजे पशुपतिनाथ मंदिर. अशा पुरातन मंदिराला भेट माझ्यासाठी एक आनंददायी क्षण. जसा मंदिरात प्रवेश केला धन्य झालो पशुपती नाथाच्या दर्शनाने आणि तेथील भव्य मंदिरे आणि अनेक पुरातन वास्तू, भागमती नदीच्या किनाऱ्यावर उभारलेले भव्य शंकराचे मंदिर परिसर आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे दर्शन त्याचच पुढे एक परिक्रमा आहे. जिथे जाण्यासाठी अनेक पायऱ्या चढून गेल्यावर अनेक अशा सुंदर प्राचीन मंदिरांचे रांग पाहून खूपच आनंद झाला परिक्रमा पूर्ण करत खाली आले असता आणखी एक मंदिराला भेट देण्याचा योग आला ते म्हणजे वैष्णवी देवीचे मंदिर अतिशय सुंदर आणि चांदीच्या गाभारा आणि लहान मंदिरे आणि तसाच परिक्रमा पूर्ण करत पशुपती नाथ मंदिराच्या मेन गेट ला आलो. 
काठमांडू येथील बुद्धापार्कमध्ये बुद्धांची भव्य अशी मूर्ती पूर्णपणे गोल्डन कलरने मोठ्या आकाराचे अनेक मूर्ती पाहून अतिशय प्रसन्न वाटले. त्यानंतर पुढचा प्रवास हा स्वयंभुनाथ मंदिर अतिशय उंच आणि प्रेक्षणीय स्थळ डोंगरावर सुंदर असे बुद्ध आणि इतर देवदेवतांचे मूर्ती आणि येथून संपूर्ण काठमांडू दिसते. 
नंतर काठमांडू येथून बसने लुम्बिनी येथे भगवान गौतम बुद्धाचे जन्मस्थान येथे भेट दिली. या ठिकाणी भारत, नेपाळ, मलेशिया, थाईलंड, इंडोनेशिया, चीन, जपान अशा अनेक देशांच्या तेथील संस्कृतीचे वर्णन आणि शिल्प कलेने अनेक मंदिरे उभारली आहेत. लुंबिनी येथील "गौतम बुद्धांचा जन्म स्थळ" या ठिकाणी जाण्याचा योग आला. एक सुखद आणि मनाला शांती देणारे स्थळ पाहून धन्य झालो. पुढच्या प्रवासाला नेपाळ बोर्डर सोनोली पर्यंत आलो तेथून निरोप घेत गोरखपूरला आलो.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nepal Tourism Attractions Pashupatinath and Lumbini Visit