राज्यात कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्या 127 डॉक्‍टरांच्या कुटुंबांसाठी मदतीचा प्रश्‍न पोहोचला केंद्राकडे ! वाचा सविस्तर 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 12 August 2020

केंद्रीय सचिव वैद्य राजेश कोटेचा व महाराष्ट्र शासन आयुष टास्क फोर्स सदस्य यांच्यात ऑनलाइन बैठक झाली. टास्क फोर्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व सदस्य उपस्थित होते. डॉ. संजय लोंढे यांनी पन्नास लाख रुपयांचा विमा विषयी महाराष्ट्रात 127 डॉक्‍टर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. शासनाने डॉक्‍टरांना नोटीसा पाठवत रुग्णालये उघडण्यास सांगितले होते. रजिस्ट्रेशन रद्द करण्याची नोटीस दिली म्हणजे एका अर्थाने सेवा अधिग्रहित केलेली आहे हे स्पष्ट आहे. त्यानंतर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या डॉक्‍टरांच्या कुटूंबियांना पन्नास लाख रुपयांची विमाभरपाई मिळायलाच हवी अशी आग्रही मागणी केली. त्यावर केंद्रीय सचिव श्री.कोटेचा यांनी सांगितले की, नोटीसा पाठवल्या म्हणजे सेवा ही शासनासाठी करतो हे सिद्ध होते त्यांना विमा भरपाई मिळायला हवी. तेव्हा मृत्यू पावलेल्या डॉक्‍टरांचा तपशील पाठवण्यात यावा. कायदेशीर सल्ला घेऊन सकारात्मक निर्णय होईल. डॉक्‍टरांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. महाराष्ट्र शासनाला सुध्दा ह्या संबंधी निर्देश दिले जातील असे स्पष्ट केले. 

सोलापूर ः कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 127 डॉक्‍टरांचा मृत्यू झाला. अद्याप त्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपये विमा भरपाई योजनेची मदत मिळावी या प्रश्‍नावर निमा संघटना व टास्क फोर्स सदस्यांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधले आहे. 

हेही वाचाः तणावमुक्ती व नवा उत्साह देणारे खेळ कधी सुरू होणार? क्रिडा क्षेत्राला प्रतिक्षा 

केंद्रीय सचिव वैद्य राजेश कोटेचा व महाराष्ट्र शासन आयुष टास्क फोर्स सदस्य यांच्यात ऑनलाइन बैठक झाली. टास्क फोर्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व सदस्य उपस्थित होते. डॉ. संजय लोंढे यांनी पन्नास लाख रुपयांचा विमा विषयी महाराष्ट्रात 127 डॉक्‍टर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. शासनाने डॉक्‍टरांना नोटीसा पाठवत रुग्णालये उघडण्यास सांगितले होते. रजिस्ट्रेशन रद्द करण्याची नोटीस दिली म्हणजे एका अर्थाने सेवा अधिग्रहित केलेली आहे हे स्पष्ट आहे. त्यानंतर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या डॉक्‍टरांच्या कुटूंबियांना पन्नास लाख रुपयांची विमाभरपाई मिळायलाच हवी अशी आग्रही मागणी केली. त्यावर केंद्रीय सचिव श्री.कोटेचा यांनी सांगितले की, नोटीसा पाठवल्या म्हणजे सेवा ही शासनासाठी करतो हे सिद्ध होते त्यांना विमा भरपाई मिळायला हवी. तेव्हा मृत्यू पावलेल्या डॉक्‍टरांचा तपशील पाठवण्यात यावा. कायदेशीर सल्ला घेऊन सकारात्मक निर्णय होईल. डॉक्‍टरांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. महाराष्ट्र शासनाला सुध्दा ह्या संबंधी निर्देश दिले जातील असे स्पष्ट केले. 

हेही वाचाः बापरे...! कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा धोका ! 

डॉ. शुभा राऊळ यांनी राष्ट्रीय आयुष अभियान निधी कोरोना विषाणू काळात वापरावा अशी मागणी केली. त्याचबरोबर डॉ.सावरीकर समितीचा अहवालातील उपाय योजना लवकर लागु करण्याचा मुद्दा समोर आला. आयुष औषधी ही आयुष तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोरोना सेंटर व आयुर्वेद रुग्णालयात देण्यात यावी. त्यामुळे संशोधन व रुग्णाला औषधोपचार करणे सोपे होईल. डॉ.अमित दवे यांनी महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालये व त्याला संलग्नित रुग्णालयात आयुष कोविड चिकीत्सा व अनुसंधानासाठी अंतर्भुत केल्यास महाराष्ट्रात पण ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ आयुर्वेदच्या धर्तीवर कोविड संदर्भात खुप मोठै काम होईल असे सुचित केले. या बाबत महाराष्ट्र आयुष संचालक व सर्व आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय यांना निर्देश दिले जातील असे आश्‍वासन केंद्रिय सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी दिले. 
या बैठकीमध्ये महाराष्ट्र टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. पद्मश्री डॉ तात्याराव लहाने, डॉ. कुलदीप कोहली, डॉ. घोलप, डॉ. राजश्री कटके, डॉ. श्रीराम सावरीकर व महाराष्ट्र शासन टास्क फोर्स सदस्य डॉ. शुभा राऊळ, डॉ. एच. बी. सिंग, डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. संजय लोंढे, डॉ. उर्मिला पिटकर, डॉ.अमित दवे सहभागी झाले होते. प्रस्तावना डॉ.शुभा राऊळ यांनी तर डॉ उर्मिला पिटकर यांनी सुत्र संचालन केले. 

शासनाची मदत मिळायला हवी 
राज्यात आयुष प्रॅक्‍टिस करणारे 127 डॉक्‍टरांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या योजनेनुसार पन्नास लाख रुपयांची विमा भरपाई मदत मिळायला हवी. त्यासाठी निमा संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. 
- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, केंद्रीय अध्यक्ष निमा संघटना 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nima raised the question of help for the families of 127 doctors who died due to corona infection! Read detailed