उत्तर सोलापूर तालुक्‍यात 12 शिक्षक कोरोना बाधित 

दयानंद कुंभार 
Sunday, 22 November 2020

उत्तर तालुक्‍यात गेल्या चार दिवसात 480 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

वडाळा(सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुक्‍यात सोमवार (ता.23) पासून शाळा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमिवर सध्या आरोग्य विभागाकडून उत्तर तालुक्‍यातील कळमण, तिर्हे, कोंडी, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उत्तर सोलापूर ग्रामीण भागातील शिक्षकांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. 

हेही वाचाः पाण्याच्या निळाईत देखण्या लालसरी पक्ष्यांचा आनंददायी विहार 

उत्तर तालुक्‍यात गेल्या चार दिवसात 480 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 
कळमण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वडाळा ग्रामीण रुग्णालयातील आवारात चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्या सकाळी 10 ते 1 या वेळेत करण्यात येत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. दिवाळीच्या सणातील गर्दीच्या पार्श्वभूमिवर यामध्ये किती शिक्षक पॉझिटिव्ह आढळतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In North Solapur taluka, 12 teachers were injured