पाण्याच्या निळाईत देखण्या लालसरी पक्ष्यांचा आनंददायी विहार 

प्रकाश सनपूरकर
Sunday, 22 November 2020

हा पक्षी बदक वर्गीय पक्षी कुटुंबात मोडतो. मोठी लालसरी या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये रेडक्रेस्टेड पोचार्ड असे म्हणतात. तर मराठी मध्ये चिकल्या म्हणतात. गोंदियामधील भंडारा जिल्ह्यात या पक्ष्यास शेंद्रया, शेंदूर बाड्डा व ठाण्यामध्ये यास भवर असे म्हणतात. हिंदी भाषेमध्ये त्यास डूम्मर, लालसर म्हणून ओळखले जाते. या पक्ष्यामध्ये नराचे डोके चौकोनाकृती असून पिवळसर-नारिंगी असते. चोच लाल, गळा व छाती काळी, वरील बाजू तपकिरी-काळपट आणि पोटाची बाहेरील बाजू पांढरी असते. मादी फिक्कट तपकिरी असून डोक्‍यावर गडद तपकिरी मुकुट असतो. मंगोलीया व युरोपमध्ये हे पक्षी प्रजनन करतात. हिवाळी हंगामात मात्र ते भारताच्या काही भागात स्थलांतरीत होतात. 

सोलापूरः यावर्षीच्या हंगामात मोठी लालसरी या पक्ष्यांचे जिल्ह्यात दुसऱ्यांदा आगमन झाले आहे. मार्च नंतर पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये हा पक्षी पाहण्यास मिळाला. 

हेही वाचाः कार्तिकी यात्रेत प्रवाशी वाहतूक सुरूच राहणार 

हा पक्षी बदक वर्गीय पक्षी कुटुंबात मोडतो. मोठी लालसरी या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये रेडक्रेस्टेड पोचार्ड असे म्हणतात. तर मराठी मध्ये चिकल्या म्हणतात. गोंदियामधील भंडारा जिल्ह्यात या पक्ष्यास शेंद्रया, शेंदूर बाड्डा व ठाण्यामध्ये यास भवर असे म्हणतात. हिंदी भाषेमध्ये त्यास डूम्मर, लालसर म्हणून ओळखले जाते. या पक्ष्यामध्ये नराचे डोके चौकोनाकृती असून पिवळसर-नारिंगी असते. चोच लाल, गळा व छाती काळी, वरील बाजू तपकिरी-काळपट आणि पोटाची बाहेरील बाजू पांढरी असते. मादी फिक्कट तपकिरी असून डोक्‍यावर गडद तपकिरी मुकुट असतो. मंगोलीया व युरोपमध्ये हे पक्षी प्रजनन करतात. हिवाळी हंगामात मात्र ते भारताच्या काही भागात स्थलांतरीत होतात. 

हेही वाचाः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी 

प्रामुख्याने हा पक्षी हिवाळ्यात भारतात व पाकीस्तानमध्ये हिवाळी पाहुणा असतो. पूर्वेकडे आसाम आणि दक्षिणेत तमिळनाडूत त्यांचे प्रमाण कमी असते. या पक्ष्याची मुख्य राहण्याची ठिकाणे म्हणजे छोटे मोठे तलाव, नदी, सरोवरे असतात. 
पाणवनस्पतींचे कोंब व मुळे, जलकीटक आदी या पक्ष्यांचे खाद्य आहे. यावर्षी मार्च महिन्यानंतर नोव्हेंबर मध्येही हे पक्षी स्थलांतर करून सोलापूर जिल्ह्यात पुन्हा दाखल झाल्याचे दिसून आले आहेत. तीन मादी आणि तीन नर या संख्येने हे मोठी लालसरी पक्ष्यांचे फोटोग्राफी रेकॉर्ड वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन फाउंडेशनच्या सदस्यांनी केले. या कामी पक्षी निरिक्षक शिवानंद हिरेमठ, सुशांत कुलकर्णी, ऋतुराज कुंभार, आदित्य क्षीरसागर, संतोष धाकपाडे, रत्नाकर हिरेमठ, निरंजन मोरे, अजय हिरेमठ, विनय गोटे यांनी निरिक्षणाचे काम केले.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pleasant ride of red birds in the blue of the water