किसान रेलद्वारे शेतमालाच्या वाहतूकीने पाच हजार टनाचा ओलांडला आकडा 

kisan rail.jpg
kisan rail.jpg
Updated on

सोलापूरः गेल्या काही महिन्यापासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या अंतर्गत सुरू झालेल्या किसान रेल उपक्रमाने जिल्ह्यातील शेती माल वाहतुकीचा पाच हजार टनाचा आकडा ओलांडला आहे. सांगोला तालुक्‍यातील शेतमाल या उपक्रमाचा सर्वाधिक पाठवला गेला आहे. या मालवाहतुकीच्या खर्चासाठी पन्नास टक्के सबसिडी देखील देण्यात आली होती. 

मागील काही महिन्यापासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून किसान रेल सेवा सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील उत्पादीत झालेल्या शेतमालाला देशातील दिल्ली, कलकत्तास बंगळूरू सारखी मोठया शहरातील बाजारपेठ मिळावी हा या उपक्रमामागचा उद्देश होता. या मालवाहतुकीसाठी केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने काही निवडक फळ व पिकांसाठी मालवाहतुकीमध्ये पन्नास टक्के सबसिडी देखील जाहीर केली होती. 

सोलापूर जिल्हयातील सांगोला या केंद्रावरून किसान रेल्वेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. नुकताच डाळिंबाची तोड होऊन माल हाती येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे सांगोल्याचे डाळिंब देशातील मोठ्या बाजारपेठामध्ये पोहोचवण्याची सोय झाली. डाळिंबासोबत शिमला मिरची, पपई, पेरू, लिंबू व केळी सारखा शेतमाल देखील पाठवला गेला. मात्र यामध्ये सर्वाधिक माल डाळिंबाचा होता. 
किसान रेल्वेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यामध्ये सांगोला ते दानापूर ही किसान रेल्वे चालवली गेली. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 4 हजार 50 टन मालाची वाहतुक केली गेली. या मार्गावर किसान रेल्वेच्या आतापर्यत 29 फेऱ्या आतापर्यत झाल्या आहेत. बंगळुरू ते दिल्ली ही किसान रेल देखील सांगोला मार्गे चालवली गेली. या मार्गावर एकूण 6 फेऱ्या चालवल्या गेल्या. त्याद्वारे 341 टन मालाची वाहतूक झाली. सांगोला ते हावरा मार्गे सिकंदराबाद या किसान रेल्वेद्वारे 308 टन वाहतूक झाली. या शिवाय हावडा साठी जनरल कोचेसच्या 'ट्रेन पाठवण्यात आल्या. त्याद्वारे 382 टन माल पाठवला गेला. सांगोला वगळता जेऊर, दौंड, बेलवंडी, कोपरगाव, बेलापूर या केंद्रावरून देखील शेतमाल अधिक प्रमाणात पाठवला गेला. मालवाहतुकीसाठी सबसिडी धरून एकूण 2 कोटी 74 लाख रुपयाचा महसूल रेल्वेला किसान रेल्वेच्या माध्यमातून मिळाला आहे. 

देशातील मुख्य शहरात शेतमाल पाठवण्याचे काम 
किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतमाल देशाच्या इतर बाजारपेठामध्ये पाठवण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये फळे व भाज्यांचा समावेश आहे. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर विभाग मध्य रेल्वे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com