धोका वाढतोय : बार्शी तालुक्‍यातील कोरोना रुग्णसंख्या तीन हजारांजवळ 

प्रशांत काळे 
Monday, 7 September 2020

आत्तापर्यंत तालुक्‍यातील 2 हजार 40 जण उपचार होऊन बरे होऊन गेले आहेत. यामध्ये शहरातील 1 हजार 177 तर ग्रामीण भागातील 863 जण आहेत. 132 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती दगडे-पाटील यांनी दिली. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर तालुक्‍यातील सोमवारी प्राप्त झालेल्या 431 तपासणी अहवालामध्ये 61 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 41 तर ग्रामीणमधील 20 असे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या 2 हजार 854 झाली आहे. तालुक्‍यातील मृतांचा आकडा 99 पर्यंत गेला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांनी दिली. 
शहरातील 304 व ग्रामीणमधील 127 असे 431 अहवाल प्राप्त झाले. शहरातील 263 व ग्रामीणमधील 107 असे 370 जण निगेटिव्ह आहेत. शहरातील 31 व ग्रामीणमधील 1 अशा 32 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरात 1 हजार 723 तर ग्रामीणमध्ये 1 हजार 131 असे एकूण 2 हजार 854 जण कोरोनाबाधित आहेत. आज आढळलेल्या अहवालामध्ये शहरातील म्हेत्रे चाळ, सोलापूर रोड, नाळे प्लॉट, नलवडे प्लॉट, ढगे मळा, पंकज नगर, वीर सावरकर चौक, गोंधिल प्लॉट, हांडे गल्ली, शिवाजीनगर, साईनगर, आझाद चौक, भवानी पेठ येथे प्रत्येक एक जण बधित आढळला. दाणे गल्ली, पाटील प्लॉट, तानाजी चौक, अलिपूर रोड, लोखंड गल्ली, कॅन्सर हॉस्पीटलजवळ, नाईकवाडी प्लॉट, होनराव प्लॉट येथे प्रत्येकी दोन तर नागणे प्लॉट 8, सुभाषनगर 4, असे 41 जण पॉझिटिव्ह आढळले. ग्रामीण भागातील वैराग, इर्लेवाडी प्रत्येकी एक, पांगरी, मांडेगाव, धसपिंपळगाव प्रत्येकी दोन, सासुरे 3, हिंगणी 4, मळेगाव 5 असे 20 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in Barshi taluka is close to three thousand