संसद सदस्यांसमवेत मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची ऑनलाइन बैठक 

madhya rail new.jpg
madhya rail new.jpg
Updated on

सोलापूरः मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची ऑनलाईन बैठक आज मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या कार्यक्षेत्रातील संसद सदस्यांसमवेत आयोजित करण्यात आली होती. रेल्वे वापरकर्त्यांसाठी प्रवासी सुविधा आणि विभागांवरील प्रस्तावित कामांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यांत सोलापूर विभागातील मध्य रेल्वेने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. खासदारांचे मार्गदर्शन हे रेल्वे विकासासाठी रोडमॅप तयार करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या हुमूल्य सूचनांमुळे रेल्वेच्या सेवा त्यांच्या संसदीय मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकसित केल्या जाऊ शकतात आणि विविध समस्या सोडविण्यात मदत होऊ शकतात असे त्यांनी नमुद केले. 

विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी 2019-20 च्या सोलापूर विभागातील कामगिरीबद्दल माहिती दिली. यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी (सोलापूर), खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (माढा), खासदार ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर (उस्मानाबाद), खासदार सुधाकर शृंगारे(लातुर), खासदार डॉ. उमेश जाधव(कलबुर्गी), आणि खासदार श्री संजयकाका पाटील(सांगली) यांनी त्यांच्या मतदारसंघातील रेल्वे प्रवासी सुविधांशी संबंधित सूचना मांडल्या. 
या बाबत महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी विभागाच्या व मुख्यालयाच्या स्तरावर असलेली कामे प्राधान्याने तत्काळ सोडविली जातील. रेल्वे बोर्ड स्तरावरील कामाच्या निकषांनुसार योग्य त्या सूचना पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 
यावेळी महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता, प्रधान वाणिज्य व्यवस्थापक मनिजीत सिंह, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक डि. के. सिंह, प्रधान मुख्य अभियंता अश्विनी सक्‍सेना, उपमहाव्यवस्थाफक दिनेश वशिस्ट, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व्ही. के. नागर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदिप हिरडे यांच्या सह शाखा अधिकारी उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Rain
Solapur Cyber Fraud
radhakrishna vikhe patil and ranjitsinh shinde
Pune Teachers Constituency
Marathi News Esakal
www.esakal.com