या कृषी विज्ञान केंद्रात झाले खरीपातील पिकावर ऑनलाईन चर्चासत्र 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

सोलापूर ः शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर तर्फे ऑनलाईन तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर यांनी केले. 

सोलापूर ः शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषी विज्ञान केंद्र सोलापूर तर्फे ऑनलाईन तांत्रिक चर्चासत्राचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. व्ही. एम. अमृतसागर यांनी केले. 

या चर्चासत्रात (कै.) वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे सोयाबीन पैदासकार डॉ. एस. पी. म्हेत्रे, बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीचे कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बोडके, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे कृषी विद्याशास्त्रज्ञ डॉ. आर. एम. गेठे, (कै.) वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. प्रल्हाद जायभाये, कीटक शास्त्रज्ञ डॉ. आर. एस. जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे होते. 

प्रदीप गोंजारी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अमृतसागर यांनी कोरडवाहू तंत्रज्ञानाचा वापर जिल्ह्यात आवश्‍यक असल्याचे सांगितले. डॉ. तांबडे यांनी कमी कालावधीच्या पिकांची लागवड करावी तसेच आवर्षणात तुर पिकामध्ये पुसा हायड्रोजेलचा वापर जल शोषक म्हणून 2.5 किलो प्रति हेक्‍टर असा करावा. ते माती खाली मुळांच्या सानीध्यात जाईल यांची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. डॉ. बोडके यांनी हवामान 
बदलानूसार जातींचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. म्हेत्रे यांनी सोयाबीनच्या विविध वाणांविषयी माहिती दिली. डॉ. गेठे यांनी तुर पिक उत्पादनाचे महत्वाचे टप्पे सांगून तुर सरी वरंब्यावर अंतरावर टोकून लावल्यास फायदेशीर ठरते असे सांगितले. डॉ. जायभाई यांनी हवामानानुसार लागवड पध्दतीमध्ये आवश्‍क तो बदल करण्याचे आवाहन केले. डॉ. जाधव यांनी सोयाबीन पिकातील किड व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमात जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोअ या तालुक्‍यातील शेतकरी तसचे कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. समाधान जवळगे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल शास्त्री यांनी आभार मानले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An online seminar on kharif crop was held at this Agricultural Science Center