आता प्रतीक्षा संपली ! पांडे सबस्टेशनवरून सिंगल फेज वीजपुरवठा कार्यान्वित

दस्तगीर मुजावर
Saturday, 5 September 2020

पांडे येथे 2012 मध्ये काम पूर्ण झालेल्या आणि प्रत्यक्षात 2013 पासून कार्यान्वित झालेल्या पांडे सब स्टेशनवरून अद्यापही सिंगल फेज वीजपुरवठा कार्यान्वित झालेला नव्हता. आमदार संजय शिंदे यांनी यामध्ये लक्ष देऊन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. व्ही. जाधव यांना सूचना करून सिंगल फेज वीजपुरवठा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजपासून (शनिवारी) वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला. 

पांडे (सोलापूर) : पांडे येथे 2012 मध्ये काम पूर्ण झालेल्या आणि प्रत्यक्षात 2013 पासून कार्यान्वित झालेल्या पांडे सब स्टेशनवरून आजपासून (शनिवारी) पांडे सब स्टेशनवरून शेलगाव फिडर व पांडे फिडवरून पांडे व गुळसडी या गावांना सिंगल फेज वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला. 

हेही वाचा : बापरे ! जुगार अड्डा कारवाईतील जप्त रक्कम हडप; "त्या' पोलिसांवर कारवाईची होतेय मागणी 

पांडे येथे 2012 मध्ये काम पूर्ण झालेल्या आणि प्रत्यक्षात 2013 पासून कार्यान्वित झालेल्या पांडे सब स्टेशनवरून अद्यापही सिंगल फेज वीजपुरवठा कार्यान्वित झालेला नव्हता. आमदार संजय शिंदे यांनी यामध्ये लक्ष देऊन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. व्ही. जाधव यांना सूचना करून सिंगल फेज वीजपुरवठा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजपासून (शनिवारी) वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी दत्ता जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास राऊत यांच्या हस्ते व गुळसडीचे माजी सरपंच मानसिंग खंडागळे, अशपाक जमादार तसेच शेलगाव, गुळसडी व पांडे येथील ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. 

हेही वाचा : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून 

याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे श्री के. ए. वाघमारे, श्री. एस. एस. पवार या अधिकाऱ्यांचा तसेच महावितरणच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गुळसडी येथील दत्ता भंडारे, शेलगाव येथील सुभाष पायघन, राहुल कुकडे, अजित काटुळे, सुनील माने, बापू माने, प्रज्वल माने, मयूर वीर, मारुती माने, संदीप पाटील, सचिन वीर, पांडे येथील सुनील मुजावर, समदभाई मुजावर, ज्ञानदेव क्षीरसागर, ज्ञानदेव दुधे, अर्जुननगर येथील समाधान भोगे आदी उपस्थित होते. 

गेल्या पाच वर्षांपासून सिंगल फेज वीजपुरवठ्याचे भिजत पडलेले घोंगडे आमदार संजय शिंदे यांच्यामुळे निकालात निघाले आणि सिंगल फेज वीजपुरवठा सुरू झाला. याबद्दल पांडे, गुळसडी व शेलगाव येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Operating single phase power supply from Pandey substation