मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश

gram panchayat.jpg
gram panchayat.jpg

मंगळवेढा(सोलापूर) ः तालुक्‍यात मुदत संपलेल्या 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांना 15 गावाचा कारभार ग्रामसेवकांच्या मदतीने पहावा लागणार आहे. पंचायत समितीमधील कार्यालयीन कामांने त्रस्त असलेल्या विस्तार अधिकाऱ्याला आता ग्रामीण जनतेच्या समस्याला सामोरे जावे लागणार आहे. 

राज्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने ग्रामपंचायत प्रशासकाच्य्‌ नियुक्तीच्‌ अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले. त्यामुळे प्रशासक म्हणून विराजमान होणाऱ्या व्यक्तीची निवड करण्याबाबत प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण होता. यामध्ये काही ठिकाणी राजकीय सौदेबाजी होण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या संदर्भात निर्णय झाला असला तरी या प्रक्रियेमध्ये प्रशासक नियुक्ती चा आदेश शासनाने काढला. 

त्या निकषांमध्ये विद्यमान सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांना प्रशासक होता येणार नाही, तसेच प्रशासक पद कोणत्याही जातीसाठी किंवा प्रवर्गासाठी राखीव ठेवता येणार नाही असेही निर्देश शासनाने देत गावच्या मतदार यादीतील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करा असा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने 14 जुलै 2020 रोजी काढला होता. त्यामुळे गावा गावात 'ती योग्य व्यक्ती कोण?' व त्या योग्य व्यक्तीचा शोध कोणत्या निकषावर घ्यायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन शासनाने दिले नसल्यामुळे प्रशासक होण्याच्या शर्यतीत असलेल्यानी नियुक्ती कशी होणार या विचाराने बुचकळ्यात पडले. 
तालुक्‍यातील 15 ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी यांना नियुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिले. ऑगस्ट अखेरीस मुदत संपणाऱ्या 15 ग्रामपंचायती असून नोव्हेंबरला मुदत संपणाऱ्या 8 ग्रामपंचायती आहेत राज्यात कोरोणाचा वाढता आलेख पाहता या ग्रामपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्यामुळे मुदतीनंतर संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रमाणे प्रशासकांची नावे व कंसात त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रशासकीय विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे (लमानतांडा,कात्राळ,बोराळे,डोणज),व्ही.एस.तवटे (तांडोर,सलगर(बु),लवंगी,कचरेवाडी)एम.ए.डोरले(मुढवी,महमदाबाद(शे),लेंडवे चिंचाळे) बी.बी.बाबर (अरळी,घरनिंकी,मल्लेवाडी) बंडू खेताडे(भोसे).  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com