यावर्षीचे शालेय व महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आदेश द्या; कोणी केली मागणी? ते वाचा 

bjp sangola.png
bjp sangola.png
Updated on

सांगोला(सोलापूर): कोरोनाच्या संकटकाळातही अनेक शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. कोरोनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा असून पालकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा स्थितीत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा असून पालकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. उद्योग, लहान-मोठे व्यवसाय पूर्णत: बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात होत असलेल्या आर्थिक कोंडीमुळे कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. 

शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. मात्र शाळांनी पालकांकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. गरीब कुटुंबांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरणेही कठीण होणार आहे. खाजगी अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित अशा सर्व शाळांचे आणि पदवीपर्यंतच्या सर्व शाखांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे शुल्क पूर्णत: माफ करावे. खाजगी शाळा-महाविद्यालयीन संस्थाचालक आणि व्यवस्थापनाला हे आदेश देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. 
ही मागणी भाजपचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. हे निवेदन तहसीलदार योगेश खरमाटे यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जि.प.सदस्य अतुल पवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे, नगरसेवक आनंदा माने, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य अमरसिंह शेंडे, योगेश बोबडे, गिरीश ताबे, आनंद फाटे, दत्तात्रय टापरे, डॉ. मानस कमलापूरकर, उमेश मंडले आदी उपस्थित होते. 
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com