Breaking! रुग्णसंख्या 17 हजारांवर अन्‌ "जनआरोग्य'चे केवळ साडेबाराशेच लाभार्थी

तात्या लांडगे
Friday, 28 August 2020

शासनाच्या निकषांनुसारच लाभार्थ्यांवर मोफत उपचार 
शासनाच्या निकषांनुसार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सोलापूर शहर-जिल्ह्यातील एक हजार 240 हून अधिक रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेत एकूण 43 रुग्णालये असून कोविडच्या काळात त्यातील 28 रुग्णालयांमधून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याची नोंद योजनेअंतर्गत होणे अपेक्षित आहे.
- डॉ. दिपक वाघमारे, समन्वयक, जनआरोग्य योजना

सोलापूर: राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्वच रुग्णांसाठी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याची मुदत आता ऑक्‍टोबरपर्यंत वाढविली आहे. मात्र, रुग्णांच्या तुलनेत लाभार्थींची संख्या खूपच कमी असल्याने बहुतांश रुग्णांना पदरमोड करावी लागत आहे. सोलापुरातील रुग्णसंख्या आता 17 हजारांवर पोचली असतानाच "जनआरोग्य योजनेअंतर्गत' केवळ एक हजार 260 रुग्णांचा मोफत उपचार मिळाले आहेत.

 

शहर-जिल्ह्यात दररोज सरासरी अडीच हजार संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यामध्ये सरासरी अडीचशे रुग्णांची भर पडू लागली असून ग्रामीणमध्ये मृतांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सहाशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्णांनी 17 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर राज्यातील रुग्णसंख्याही साडेसात लाखांपर्यंत पोहचली असून त्यापैकी 23 हजार 500 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या तुलनेत जनआरोग्य योजनेचा लाभ बहुतांश रुग्णांना मिळालेला नाही. लक्षणे नसलेल्या, थोडीफार लक्षणे असलेल्या तथा ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची गरज नसलेल्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी, राज्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्‍यता व्यक्‍त करीत राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्वच रुग्णांना उपचार मिळतील, असे स्पष्ट केले.

 

शासनाच्या निकषांनुसारच लाभार्थ्यांवर मोफत उपचार 
शासनाच्या निकषांनुसार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सोलापूर शहर-जिल्ह्यातील एक हजार 240 हून अधिक रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेत एकूण 43 रुग्णालये असून कोविडच्या काळात त्यातील 28 रुग्णालयांमधून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याची नोंद योजनेअंतर्गत होणे अपेक्षित आहे.
- डॉ. दिपक वाघमारे, समन्वयक, जनआरोग्य योजना
 

 • जनआरोग्य योजनेची स्थिती 
 • एकूण रुग्णालये 
 • 43 
 • कोविड रुग्णांसाठी उपलब्ध हॉस्पिटल 
 • 28 
 • शहर-जिल्ह्यातील एकूण रुग्ण 
 • 17,200 
 • आतापर्यंतचे लाभार्थी रुग्ण 
 • 1,260 
 • ऑनलाइन नोंदणीस होतोय विलंब 
  कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाला रुग्णालयात ऍडमिट केल्यानंतर त्याची नोंद जनआरोग्य योजनेअंतर्गत करणे आवश्‍यक असते. मात्र, एखादा रुग्ण गंभीर असल्याने त्यासंदर्भातील कागदपत्रे, अर्ज भरणे वेळेत शक्‍य होत नाही. त्यानंतर अशा रुग्णांच्या नातेवाईकांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगितले जाते. रुग्णाचा जीव वाचवणे महत्त्वाचे असल्याने अनेकजण संबंधित रुग्णालयाविरुध्द तक्रार करीत नसल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच रुग्ण अधिक अन्‌ योजनेचे लाभार्थी कमी, असे चित्र राज्यभर पहायला मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over 17,000 patients and only one and a half hundred beneficiaries of mahatma fule Janaarogya yojna