कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंढपुरातील मुख्य बाजारपेठ बंद

Pandharpur main market closed due to corona positive patients
Pandharpur main market closed due to corona positive patients

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरात दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. साथ पसरू नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने बाधित क्षेत्रापासून एक ते दीड किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित केला आहे. या भागातील मुख्य बाजार पेठ बंद करण्यात आली आहे. याबाबत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी अधिकृत परित्रक काढले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. 
चार दिवसापूर्वी तालुक्‍यातील उपरी गावात कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर बुधवारी पंढरपूर शहरासह उपरी, गोपाळपूर आणि करकंब येथे पाच नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात भिती वाढली आहे. 
शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या ज्ञानेश्वर झोपड पट्टी भागात मुंबईहून दोघे जण आले होते. त्यांना पालिका प्रशासने संस्थापक क्वारंटाईन केले होते. दरम्यान हे दोघेही पॉझिटिव्ह आढळून आल्याने पालिकेने खबदारी घेतली आहे. आज पहाटे येथील शिवाजी चौक, इंदिरा गांधी चौक, अर्बन बॅक, आंबेडकर पुतळा या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय प्रतिबंधित क्षेत्रील सर्व दुकाने आणि अस्थापने बंद करण्यात आली आहेत. पालिकेने तत्काळ बाधीत क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. या भागातील रस्ते आणि घरांमध्ये निर्जंतुकीकरणही सुरू केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com