आमदार भारत भालके यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या बंधूंनी घातले विठ्ठलाला साकडे 

भारत नागणे 
Friday, 27 November 2020

पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कालपासून त्यांना अधिक त्रास वाढला होता. दरम्यान, आज (शुक्रवारी) दुपारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना दीर्घायू लाभावे, ते लवकर या संकटातून बाहेर यावेत, असे साकडे त्यांचे लहान बंधू पंजाबराव भालके यांनी आज दुपारी श्री विठ्ठल - रुक्‍मिणीच्या चरणी घातले.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कालपासून त्यांना अधिक त्रास वाढला होता. दरम्यान, आज (शुक्रवारी) दुपारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांना दीर्घायू लाभावे, ते लवकर या संकटातून बाहेर यावेत, असे साकडे त्यांचे लहान बंधू पंजाबराव भालके यांनी आज दुपारी श्री विठ्ठल - रुक्‍मिणीच्या चरणी घातले. 

याबाबत त्यांचे बंधू पंजावराव म्हणाले, की त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारास ते प्रतिसाद देत आहेत. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

अलीकडेच आमदार भारत भालके यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. उपचारानंतर ते घरी परत आले होते. परंतु, मागील आठ दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारास ते प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती चांगली व्हावी. लोकांच्या सेवेसाठी पुन्हा लवकर यावेत, यासाठी आज त्यांचे बंधू पंजाबराव यांनी विठ्ठलाला साकडे घालून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panjabrao Bhalke prayed to Vitthal to grant long life to MLA Bharat Bhalke