परिचारक, आवताडे, पाटील व रोंगे यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी

bjp press.jpg
bjp press.jpg

पंढरपूर (सोलापूर) ः  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, उद्योजक अभिजीत पाटील, प्रा.डाॅ.बी.पी.रोंगे यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली अहे. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी , माजी मंत्री बाळा भेगडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री.भेगडे म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाकडे आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, प्रा.डाॅ.बी.पी.रोंगे यांनी उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे..

या संदर्भात विचारविनिमय करुन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे उमेदवारांची नावे शिफारश करुन पाठवली जातील. त्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसात केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड उमेदवार घोषीत करेल. अामच्या दृष्टीने परिचारक कुटंब हे पक्षाचे कुटुंब अाहे.त्यांच्यासह अन्य सर्व इच्छुक उमेदवारांच्या नावांची शिफारस अाम्ही करणार अाहोत असे श्री.भेगडे यांनी स्पष्ट केले. 

श्री. भेगडे यांनी आज येथे मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील सध्याचे सरकार हे ठाकरे सरकार नसून महावसुली सरकार आहे पोलिसांच्या माध्यमातून दरमहिन्याला शंभर कोटी रुपयांची वसूली करण्याचे काम राज्याचे गृहमंत्री करतात हे राज्याचे दुर्देव आहे.. शेतकरी असो, कामगार असो सर्वांचे जीवन या सरकारने उध्वस्त केले आहे. त्यामुळे या सरकार विषयी जनतेच्या मनात चीड असून ती या निवडणूकीतून दिसून येईल. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास श्री.भेगडे यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे उपस्थित होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com