परितेचा योगेश रक्ताच्या कर्करोगाशी लढतोय

Parites Yogesh is battling blood cancer
Parites Yogesh is battling blood cancer

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : अभ्यासातून वेळ काढून कॉलेजमधील धम्माल, मजामस्ती बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी जगणारी तरुणाई कही वर्षापासून आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्याला मिळणाऱ्या पॉकेटमनीमधले पैसे साठवून गरजू मित्रांसाठी ही मुलं राबताना दिसतात. कधी पार्टटाईम जॉब करून ही तरुणाई पैसे गोळा करते आणि समाजातल्या गरजूंना मित्रांच्या सुख दुःखात  मदतीचा हात पुढे सामील झालेली पहायला मिळते, अशीच एक मैत्रीची टिम माढा तालुक्यातील परिते येथील रक्ताचा कर्करोग असलेल्या मुलाच्या मदतीसाठी धडपडत आहे. कॉलेजमधुन आतापर्यंत जवळपास एक लाख ५० हजार त्यांनी त्यासाठी जमा केले आहेत, मात्र आणखी त्यांना मदतीची गरज आहे. योगेश गायकवाड असे ब्लड कॅन्सरग्रस्त मुलाचे नाव आहे. 

हेही वाचा- व्यवस्थेची माती; स्मार्ट सोलापुरातले नागरिक का आहेत त्रस्त
योगशच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट, आई- वडिल शेतकरी आहेत. रोज मिळेल तिथे कामाला जातात. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या तिन्ही मुलींची लग्न केली. योगेशेला अभियांत्रिकी व्हायचे असल्याने हलाखीच्या परिस्थिती देखील आई- वडिलांनी त्याला उच्च शिक्षणासाठी पंढरपुर येथील स्वेरीच्या कॉलेजला अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊन दिला. योगेश कॉलेजमध्ये 'कमवा आणि शिका' या योजनेखाली शिक्षण घेत आहे. तो हुशार असल्याने व स्वभावाने अत्यंत प्रेमळ व गरीब असल्याने त्याचा मित्र परिवारही मोठा आहे. त्यात योगेश आता काही वर्षात अभियांत्रिकी होईल व मग घरची हलाखीची परिस्थिती बदलेल, असे स्वप्न त्याचे आई- वडिल पाहत होते. परंतु नियतीची चक्र कधी कसे फिरेल सांगता येत नाही. योगेशला अचानक रक्ताचा कर्करोग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अन् कुटूंबाला मोठा धक्काच बसला आहे.
योगेशच्या उपचारासाठी एवढी मोठी रक्कम आणायची कुठून या विवचंनेत सध्या हे कुटूंब आहे. त्याच्या या आजाराची वार्ता त्याच्या महाविद्यालयात समजली अन् सुरू झाली मदतीसाठीची धडपड. कुणी सहलीसाठी तर कुणी मोबाईल, तर कुणी कपडे घेण्यासाठी घरून आणलेले पैसे सर्व मित्रांनी एकत्रित केले. जवळपास एक लाख ५० हजार गोळा करून. मित्राच्या उपचारासाठी 'फुल नाय फुलाची पाकळी' म्हणुन मदत देऊ केली आहे. मित्रांनी मैत्री निभावली आहे. परंतु रक्ताच्या कर्करोगाशी लढणार्यां योगेशला उपचारासाठी मोठी रक्कम लागणार असुन त्याला समाजातील अजुन दानशुर व्यक्तींच्या मदतीची गरज आहे. 
उपचारासाठी थोडीफार रक्कम जमा केली
योगेश हा मनमिळाऊ मुलगा आहे. त्याला रक्ताचा कर्करोग झाला आहे. ही बातमी ऐकुन आम्ही सर्व मित्रांनी त्याच्या उपचारासाठी थोडीफार रक्कम जमा केली आहे. यासाठी शिक्षकांनीही मदतीचा अश्वासन दिले आहे. परंतु समाजातील दानशुर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी पुढे यावे, अशी आमची इच्छा आहे.
- अविनाशकर शिंदे, विद्यार्थी स्वेरी

मदतीसाठी संपर्क : 9309710104, 9271981229

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com