Bharat Bandh Update विविध पक्षांचा व व्यापारी संघटनांचा मोठा प्रतिसाद 

navipeth.jpg
navipeth.jpg
Updated on

सोलापूरः केंद्र सरकारने केलेला कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या आंदोलनास सोलापूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या भारत बंदसाठी राज्यातील आघाडी सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या सत्ताधारी पक्षाबरोबरच माकप, शेतकरी संघटना, विविध व्यापारी असोसिएशनकडून बंद ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. शहरात माकपच्या वतीने रस्ता रोको करताना पोलिसांनी हे आंदोलन दडपून टाकले. यावेळी पोलिसांनी केलेल्या धरपकडीवेळी अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. 

केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी संपूर्ण भारतात विविध राजकीय पक्ष संघटनांकडून भारत बंदची हाक देण्यात आली होती. 

सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, दत्तनगर, शांती चौक, जिल्हा परिषद या ठिकाणी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलने करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बाजार समितीत दुपारपर्यंत शुकशुकाट होता. याशिवाय शहरातील मुख्य बाजारपेठ असलेली नवी पेठ, विजापूर वेस, पार्क चौक, लक्ष्मी मार्केट, जोडबसवण्णा चौक, दत्तनगर, अशोक चौक, चाटी गल्ली, मधला मारूती, भांडे गल्ली, टिळक चौक, सराफ बाजार या परिसरातील व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. सकाळच्या सुमारास महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी नवी पेठ, चाटी गल्ली, मंगळवार पेठ पोलीस चौकी परिसर फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यासाठी आवाहन केले. याप्रसंगी सोलापूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण, लहू गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंद करण्याबाबत आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भाजी वाटून अनोख्या पध्दतीने सरकारच्या विरोधात निदर्शने केली. शहरातील सर्व बॅंका, शासकीय कार्यालये आणि हद्दवाढ भागातील सर्व व्यवहार व कामकाज सुरळितपणे चालू होते. 

नरसय्या आडम यांच्यासह अनेकजण पोलिसांच्या ताब्यात 
भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी माकपने सकाळी अकराच्या सुमारास माकपचे नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्त्वात शांती चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर शहर पोलिसांनी हा मोर्चा दडपून टाकला. यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना धरपकड करण्यास सुरुवात केल्यानंतर आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी झाली. या वादावादीतून नंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना चोप देण्यास सुरुवात केली. याप्रसंगी पोलिसांनी माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह अनेक कामगारांना ताब्यात घेऊन मुख्यालय येथे नेले. तर पोलिसांच्या मारहाणीत अनिल वासम, विजय हरसुले, बाळकृष्ण मल्याळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

नुकसानीचा विचार न करता बंदला सहकार्य 
शेतकरी आंदोलन करीत असताना व्यापाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाला सहकार्य करणे हे क्रमप्राप्त आहे. सोलापुरातील व्यापाऱ्यांनी त्यांचे होणारे नुकसान बाजूला ठेवत सहकार्याच्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या आंदोलनालचा पाठिंबा देत व्यापार बंद ठेवला. 
-अशोक मुळीक, अध्यक्ष, नवी पेठ व्यापारी असोसिएशन. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com