रुग्ण सापडला एका पिंपळगावात अन....

corna update.jpg
corna update.jpg

मळेगाव(सोलापूर) ः पिंपळगावात कोरोनाचा रुग्ण सापडल्याची घटना घडताच अफवाच्या बाजाराने बार्शी तालुक्‍यातील ढाले पिंपळगावचे ग्रामस्थ चांगलेच त्रस्त झाले. 
या अफवाच्या गोंधळातून तालुकाभरातील ग्रामस्थांना सत्य घटनेची माहिती मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. 

सध्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णाबाबत मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असल्याने ग्रामस्थ चांगलेच त्रस्त झाले आहेत. 
तालुका प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तालुक्‍यात कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळला नाही. मात्र, काही लोकांकडून विनाकारण अफवेचे पीक पेरले जात असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बार्शी तालुक्‍यातील पिंपरी (आर) गावचं दिल्ली कनेक्‍शन, अक्कलकोट तालुक्‍यातील चपळगावचे मानेगाव व घाणेगावशी कनेक्‍शन, मळेगावला सापडला, वैरागच्या बाजारपेठेत घुसला अशा अफवा सध्या पसरत आहेत. अफवांवर विश्‍वास ठेवू नका व इतर नियमाचे असे आवाहन केले जात आहे. 
मात्र, लोकांच्या मानगुटीवर बसलेले कोरोनारूपी अफवांचे भूत खाली उतरायला काय तयार नाही. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्‍यातील पिंपळगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळला. परंतु चर्चेची नाळ बार्शी तालुक्‍यातील ढाळे पिंपळगावशी जोडली गेली. वैरागमधील पती-पत्नीचा रिपोर्ट येण्याअगोदरच वैराग भागातील 57 खेड्यांत निरर्थक अफवा पसरल्या. मळेगाव येथे नवी मुंबई व पुणे येथून आलेल्या चार जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यातील एकाला किरकोळ त्रासामुळे दवाखान्यात हलवले, मात्र त्याची अफवा पसरली. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे. 

अफवावर विश्‍वास ठेवू नये 
ढाळे पिंपळगाव येथे एकही रुग्ण सापडलेला नाही व कोणाला त्रासही नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्‍यातील पिंपळगाव येथे कोरोना रुग्ण आढळला आहे. त्याचा बार्शी तालुक्‍यातील ढाळे पिंपळगाव गावशी संबंध जोडला जात आहे. त्यामुळे नगरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. 
- नानासाहेब काळे, माजी सरपंच, पिंपळगाव 

मळेगावात कोरोनाची लागणच नाही 
मळेगाव व परिसरातील लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. या व्यक्तीला सध्या कोणताही त्रास नाही व कोरोनाची लागणपण झालेली नाही. 
- गुणवंत मुंढे, सरपंच, मळेगाव  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com