बार्शीत वृक्षारोपण, मिठाई वाटपासोबत फटाक्‍यांची आतषबाजी !

प्रशांत काळे
Wednesday, 5 August 2020

शहरातील भगवंत मंदिर शेजारी असणाऱ्या श्रीराम मंदिरात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडेअकराच्या दरम्यान आरती करुन श्री राम मंदिर भूमिपूजनचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

बार्शी (सोलापूर): शहरामध्ये राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने पाच हजार वृक्षारोपण करण्याचा निर्धार करण्यात आला. या सोबत मिठाई वाटप, फटाक्‍यांची आतषबाजी देखील करण्यात आली. 

हेही वाचाः अवघ्या चोविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्ना युपीएससी मध्ये यश ! सागर मिसाळने मिळवली देशात 204 वी रॅंक 

शहरातील भगवंत मंदिर शेजारी असणाऱ्या श्रीराम मंदिरात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडेअकराच्या दरम्यान आरती करुन श्री राम मंदिर भूमिपूजनचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

हेही वाचाः लॉकडाउननंतर हटवली बंधने आता रोजच शेतमालाची खरेदी कोठे? ते वाचा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात पालिकेतील पक्षनेते, नगरसेवक विजय राऊत यांचे हस्ते सुमारे 50 कारसेवकांचा भगवा फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. शहरातील रामभाऊ पवार चौक, भोसले चौक, मल्लप्पा धनशेट्टी चौक, पांडे चौक, नगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, राममंदिर येथे रामभक्तांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. तर एकमेकांना मिठाई, पेढे वाटप करून आनंद साजरा केला. 
भाजप व मॉर्निंग क्‍लबच्या वतीने छत्रपती भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात 5000 वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला. आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली फटाक्‍यांची आतषबाजी करुन श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रामभाऊ पवार चौकात हिंदू महासभेच्यावतीने प्रतिमेचे पूजन करुन घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अनिल पवार, जिल्हाध्यक्ष शंकर काकडे, शहराध्यक्ष दत्तात्रय पवार, दिलीप मैंदरकर, दिपक पवार, श्रीकांत शहाणे, सुधीर राऊत, राजेंद्र जाधव, शक्ती पवार, रणजीत जगदाळे, अमोल पवार सहभागी झाले होते. 
बाजार समिती येथे झालेल्या कार्यक्रमास भाजपचे नगरसेवक प्रशांत कथले, तालुकाध्यक्ष मदन दराडे, शहराध्यक्ष महावीर कदम, कारसेवक संतोष सुर्यवंशी, पंचायत समिती सदस्य प्रमोद वाघमोडे, अविनाश मांजरे, उमेश बारंगुळे, नगरसेवक ऍड. महेश जगताप, विजय चव्हाण, भैया बारंगुळे, संदेश काकडे संघ कार्यालयातील कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक मोहन श्रीरामे, अनिल खजिनदार, तुषार महाजन, सूर्यकांत देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे सतीश आरगडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, मेजर मोरे, बबन चकोर, समाधान पाटील, प्रशांत खराडे, कारसेवक, अभाविपचे पदाधिकारी व श्रीरामभक्त उपस्थित होते. 

 

संपादनः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plantation in Barshi, distribution of sweets and fireworks!