#Crime : मी कोण आहे ओळखत नाही का? बघून घेतो.. 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

स्वतःच्या डोक्‍यात वीट मारून घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तुमच्या विरुद्ध तक्रार देतो असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली.

सोलापूर : मी कोण आहे ओळखत नाही का? तुम्हाला बघून घेतो.. असे म्हणून पोलिसाला दमदाटी, शिवीगाळ केली. स्वतःच्या डोक्‍यात वीट मारून घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तुमच्या विरुद्ध तक्रार देतो असे म्हणून पोलिसांसमोरून पळ काढला. याप्रकरणात रिक्षामध्ये गॅस भरणाऱ्या विशाल नाईकवाडी याच्यावर विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू होती छमछम! अन्‌..

सरकारी कामात अडथळा
जुळे सोलापुरातील कल्याण नगर या ठिकाणी बेकायदेशीरपणे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधील गॅस रिक्षामध्ये भरणाऱ्या विशाल नाईकवाडी याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. नाईकवाडी याने राहते घराच्या ठिकाणी घरगुती गॅस मधील गॅस हे ज्वलनशील व स्फोटक पदार्थ आहे हे माहीत असतानाही इलेक्‍ट्रिक मोटारीच्या सह्याने रिक्षामध्ये इंधन म्हणून भरत असल्याचे दिसून आले. त्याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी गेल्यानंतर त्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

चोरट्यांचे पोलिसांना आव्हान! चार ठिकाणी फोडली दुकाने

पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की
मी कोण आहे ओळखत नाही का? तुमचे बघून घेतो.. असे म्हणून त्याने स्वतःच्या डोक्‍यात वीट मारून घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तुमच्या विरुद्ध तक्रार देतो असे म्हणून पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. त्याठिकाणी जमलेल्या गर्दीतून नाईकवाडी याने आपले सर्व साहित्य रिक्षामध्ये भरले आणि तो तेथून पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार हिंदुराव पोळ यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police constable Damdati, Shivigal