बापरे! चालकाने पळविला २२ लाखांच्या डाळिंबाचा ट्रक

बापरे! चालकाने पळविला २२ लाखांच्या डाळिंबाचा ट्रक

सांगोला : ट्रक चालकाने सांगितलेल्या ठिकाणी बाजारपेठेत डाळिंब न पोचवता 24 हजार किलो डाळिंब परस्पर विकून सुमारे 22 लाख तीन हजार रुपये किमतीचा माल परस्पर अपहार केल्याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मेजर मुलकसिंग (रा. स्पेरहरी, जि. पटियाला, पंजाब), रामपाल (रा. रताखेडा, जि. फतेहबाद, हरियाणा) ट्रकचालक हरप्रित सिंग (रा. चंदरकल्याण थाना, जि. फतेहबाद, हरियाणा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. डाळिंब व्यापाऱ्यांची ट्रक चालकांनी फसवणूक केल्याची जानेवारी महिन्यातील तिसरी घटना असून यामुळे शेतकरी, व्यापारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, शशिकांत विठ्ठल येलपले (रा. यमगर मंगेवाडी, ता. सांगोला) हे डाळिंबाचा व्यापार करतात. 15 जानेवारीला शशिकांत येलपले यांनी त्यांच्या ज्ञानराज कृषी ट्रान्सपोर्ट सांगोला येथून ट्रकमधून (पीबी 13 बीए 2666) 20 लाख 60 हजार रुपये किमतीचे 24 हजार 081 किलो डाळिंब वाहनात भरून त्रिपुरा येथील कोयलासर येथे पाठविण्यास मेजर मुलकसिंग (रा. स्पेरहरी, जि. पटियाला, पंजाब), रामपाल (रा. रताखेडा, जि. फतेहबाद, हरियाणा), ट्रकचालक हरप्रित सिंग (रा. चंदरकल्याण थाना, जि. फतेहबाद, हरियाणा) यांना सांगितले होते. डिझेलसाठी एक लाख 43 हजार रुपये दिले होते. परंतु चालक हरप्रित सिंग याच्यासह सोबत असलेल्या चालकांनी ट्रकमध्ये भरलेले डाळिंब कोयलासर त्रिपुरा येथे न पोचविता सुमारे 20 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 24 हजार 081 किलो डाळिंबाची परस्पर विक्री केली. 
याबाबत शशिकांत येलपले यांनी मेजर मुलकसिंग (रा. स्पेरहरी, जि. पटियाला पंजाब), रामपाल (रा. रताखेडा, जि. फतेहबाद, हरियाणा), ट्रकचालक हरप्रित सिंग (रा. चंदरकल्याण थाना, जि. फतेहबाद, हरियाणा) या तिघांविरुद्ध डाळिंब नियोजित ठिकाणी न पोचविता परस्पर डाळिंबाची विक्री करून 22 लाख तीन हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याची फिर्याद सांगोला पोलिस ठाण्यात दिली आहे. 

परस्पर विक्रीच्या घटना वाढल्या 
डाळिंब व्यापारी सांगोला तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून डाळिंबाची खरेदी करून महाराष्ट्र व परराज्यात पाठवत आहेत. परंतु ट्रकचालक व्यापाऱ्यांनी सांगितलेल्या ठिकाणी डाळिंब पोच न करता परस्पर विक्री करत असलेच्या सहा महिन्यांत पाच ते सहा घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी व ट्रान्सपोर्ट करणारे व्यापारी यांच्यत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com