महापुरुष पडले अडगळीत : सुभाषचंद्र बोस, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांची दुरावस्था 

महापुरुष पडले अडगळीत :  सुभाषचंद्र बोस, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांची दुरावस्था 

सोलापूर : कोणा महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाली, तर संबधित महापुरुषांच्या जातीचा समाज लगेच रस्त्यावर उतरतो. दंगली होतात. मात्र, अनेक वर्षे दुर्गंधी व अस्वच्छतेशी सामाना करत अनेक महापुरुषांचे पुतळे आज उभे आहेत. जेलरोड परिसरातील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अशाच दुरावस्थेत दिवस कंठत आहेत. तसेच सात रस्ता परिसातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यालाही रंगरंगोटीची आवश्‍यकता आहे. 
"आरंभशूर आम्ही' या उक्तीप्रमाणे महापालिका प्रशासन मागणीप्रमाणे पुतळे उभारत आहेत. अजूनही नवेनवे पुतळे उभारले जात आहेत. मात्र, त्याच्या देखभालीचा प्रश्‍न ना महापालिका प्रशासन हाताळते, ना संबंधित पुतळ्याची मागणी करणारा समाज हताळतो. शहराच्या चौकाचौकात विविध महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांच्या स्वच्छतेची तसेच डागडुजी व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. याची दखल घेऊन महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने समर्थ ओझा आणि त्याचा मित्रपरिवार दर रविवारी शहरातील पुतळ्यांची स्वच्छता करत आहेत. मागील पाच रविवार हा उपक्रम सुरू झालेला आहे. पुतळ्याची स्वच्छता व साफसफाई करणे, या युवकांना शक्‍य असले तरी दुरुस्ती, रंगरंगोटी आणि पायाभूत सुविधाची उभारणी करणे अशक्‍य आहे. 
शहारातील पेंटर चौक ते जमखंडी पूल या मार्गावरील जिजामाता प्रसुतीगृहासमोरील बागेतील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अशाच दुरावस्थेत 
दिवस कंठत आहेत. महापौर यु. एन. बेरिया यांच्या कारकिर्दीत 1991 साली सुभाष उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन नगरविकास मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व तत्कालीन आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार युन्नुसभाई शेख यांच्या उपस्थित करण्यात आले. 
या पुतळ्यासाठी करण्यात आलेल्या सुशोभिकरणाची सध्या अतिशय वाईट अवस्था झाली आहे. कठड्याची फरशी पूर्णपणे फुटली आहेत. या उद्यानात सर्वत्र कचरा साठलेला असून, दुर्गंधी पसरली आहे. लहान मुलांसाठी बसवण्यात आलेली खेळणी पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. कारंज्या बंद पडलेल्या असून, उद्यान परिसारतील उघड्यावर शौचास बसणे, मुतारी यामुळे संपूर्ण उद्यानाची दुरावस्था झाली आहे. 

महापालिकेनेही लक्ष द्यावे 
सात रस्ता परिसरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या रंगरंगोटीची आवश्‍यकता आहे. दर रविवारी शहरातील पुतळ्याची स्वच्छता करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष समर्थ ओझा सांगतात, की आम्ही पुतळ्याची स्वच्छता मोहीम स्वत:हून राबवत आहोत. मात्र महापालिकेनेही या पुतळ्यांच्या देखभालीची रंगरंगोटीची जबाबदारी पार पाडणे आवश्‍यक आहे. सध्या महराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या रंगरंगोटीची आवश्‍यकता असून लवकर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्यावतीने महापौर व आयुक्त यांना निवेदन देणार आहोत. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com