राजस्थानहून बॅग आली, पण अमेरिकेतून मागवलेले बूट गायब!

राजस्थानहून बॅग आली, पण अमेरिकेतून मागवलेले बूट गायब!
Updated on

सोलापूर : विश्‍वासपूर्ण सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय टपाल विभागाविषयी सोलापुरातील डॉ. रमेश अग्रवाल यांनी केलेली तक्रार समोर आली आहे. डॉ. अग्रवाल यांच्या भावाने राजस्थानहून स्पीड पोस्टने पाठवलेल्या बॅगेतील साहित्य चोरी गेले आहे. याबाबत तक्रार करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

#Solapur : विमानतळातील गवताला लागली आग 

बॅग स्पीड पोस्टच्या पाठविली
डॉ. अग्रवाल हे काही दिवसांपूर्वी घरगुती कामानिमित्त राजस्थानला भावाकडे गेले होते. तेथील काम संपल्यानंतर ते परत सोलापुरात आले. तेथून निघताना सोबत असलेल्या सामानाचे वजन जास्त झाल्याने त्यांनी एक बॅग भावाकडे ठेवली होती. ती बॅग भावाने स्पीड पोस्टच्या माध्यमातून सोलापूरला डॉ. अग्रवाल यांच्या पत्त्यावर पाठविली.

तुझ्यासोबत लग्न करून चूक केली..!

नवीन बूट, साडी  गायब

बॅग पाठवताना वजन 10.190 किलो ग्रॅम इतके होते. येथे आल्यावर बॅग जशीच्या तशी होती, पण बॅगेचे वजन कमी होऊन 8.700 किलो ग्रॅम इतके झाले होते. बॅग उघडून पाहिले असता आतील 12 हजार किमतीचे अमेरिकेतून मागवलेले नवीन बूट, चार हजार रुपयांची साडी काढून घेतल्याचे लक्ष आले. या संदर्भात डॉ. अग्रवाल यांनी भारतीय टपाल विभागाच्या कार्यालयात तक्रार केली, पण महिना उलटून गेला तरी समाधानकारक उत्तर मिळत असल्याचे डॉ. अग्रवाल यांचे म्हणणे आहे. 

बॅगेतून चोरीला गेलेल्या माझ्या वस्तू सापडतील की नाही माहिती नाही, पण अशी घटना इतरांसोबत होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तक्रारीनंतर मला फोन करून बोलावले होते. त्या ठिकाणी मला वस्तू सापडणे अवघड असल्याचे सांगून तक्रार मागे घेण्यास सांगितले. अशा सेवेमुळे टपाल विभागाची विश्‍वासार्हता कमी होत आहे. 
- डॉ. रमेश अग्रवाल, 
फॉरेस्ट 


डॉ. रमेश अग्रवाल यांची तक्रार टपाल विभागाकडे आली आहे. तक्रार निरीक्षकांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 
- जी. पी. दातार, 
सहायक अधीक्षक, टपाल विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com