बळीराजाला फटका ! अवकाळीमुळे नुकसान नसल्याचा अहवाल 

FARMER PROBLEMS
FARMER PROBLEMS
Updated on

सोलापूर : राज्यातील सहा जिल्ह्यांना या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामध्ये फळपिकांचे नुकसान झाले आणि त्यानुसार 71 हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला. मात्र, अंतिम अहवालात काहीच नुकसान झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा दमडाही मिळणार नाही. 


विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्ह्यातील फळपिकांना अवकाळीचा फटका बसला. त्यानुसार संबंधित महसूल प्रशासन व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल तयार केला. त्यानुसार सुमारे 11 लाख शेतकऱ्यांच्या 71 हजार हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान या अवकाळीमुळे झाल्याचा अहवाल पाठविला. त्यानंतर अंतिम अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये काहीच नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या पावसाचा फायदाच झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून काहीच नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 


अंतिम अहवालानुसार काहीच नुकसान नाही 
काही दिवसांपूर्वी विदर्भ, मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. संबंधित जिल्ह्याच्या अहवालानुसार 71 हजार हेक्‍टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला. पंचनामे केल्यानंतर तेथील पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अंतिम अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला आहे. 
- हरी बाबटीवाले, उपसंचालक, कृषी 


नुकतीच मदत दिल्याने उरकला पंचनामा 
मागील वर्षाच्या शेवटी राज्यातील महापुर आणि त्यानंतर झालेल्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने आकस्मित निधीतून हजारो कोटींची मदत केली. त्यामुळे आता झालेल्या अवकाळीचा पंचनामा संबंधित अधिकाऱ्यांनी उरकता घेतल्याची चर्चा आहे. प्राथमिक अहवाल आणि अंतिम अहवालात एवढा मोठा फरक कसा, शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचे सांगूनही काहीच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाला गेल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com