तुम्हाला माहितेय का? ‘या’ खात्यात पैसे नसानाही काढता येतात ५०००; त्यासाठी काय करावे वाचा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

सरकारन शेतकरी, उद्योजक, नागरिकांसाठी विविध योजना आणत असते. मात्र, त्याची पुरेसी माहितीच नागरिकांपर्यंत पोचत नाही. अशीच एक मोदी सरकारने योजन आणली. ती म्हणजे पंतप्रधान जन धन खाते. ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. आर्थिक समावेशनाव्यतिरिक्त या योजनेचे काही फायदे आहेत.

सोलापूर : सरकारन शेतकरी, उद्योजक, नागरिकांसाठी विविध योजना आणत असते. मात्र, त्याची पुरेसी माहितीच नागरिकांपर्यंत पोचत नाही. अशीच एक मोदी सरकारने योजन आणली. ती म्हणजे पंतप्रधान जन धन खाते. ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. आर्थिक समावेशनाव्यतिरिक्त या योजनेचे काही फायदे आहेत. काही खातेधारकांना या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. त्यासाठी खातेधारकाचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. आधार आणि बँक खाते लिंक नसल्यास या ओव्हरड्राफ्ट योजनेचा फायदा घेता येत नाही, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत खातेधारक त्याच्या खात्यामध्ये अजिबात शिल्लक नसताना पैसे काढू शकतो.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देशातील प्रत्येक नागरिक बँकिंगशी जोडला जावा याकरता जन धन सेवा सुरू करण्यात आले. कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही जन धन खाते सुरू करू शकता. बँक मित्राच्या साहाय्यानेही हे खाते काढता येते. या खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक ठेवण्याची अट नाही आहे. हे खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्राव्यतिरिक्त केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. तुमचा फोटो देखील देणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र तुम्हाला तुमच्या सेल्फ अॅटेस्टेड फोटोसह बँक अधिकाऱ्याच्या समोर स्वाक्षरी करून खात्यासाठी अर्ज करता येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकांना पहिले सहा महिने त्यांचे खाते व्यवस्थित ठेवावे लागते, असं तज्ज्ञांने मत आहे. त्यांच्या खात्यामध्ये या काळात आवश्यक रक्कम असणे गरजेचे आहे. त्यामध्ये व्यवहार होणेही आवश्यक आहे. या खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड दिले जाते. त्याचा वापर करून अनेक व्यवहार सहज करता येतात. तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्यांना खाते व्यवस्थित वाटले तर या सुविधेअंतर्गत पाच हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते. काही प्रकरणात ही सुविधा आंशिक व्याज चुकते केल्यानंतर मिळते.
या खातेधारकांना मिळणाऱ्या रुपे डेबिट कार्डवर ग्राहकांना लाक रुपयांपर्यंतचा आपघात वीमाही मिळतो. त्याप्रमाणे खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवण्याची देखील चिंता नसते. मात्र तुमचे खाते आधारशी लिंक नसेल तर नॉमिनीला देखील अपघाती वीम्याचा लाभ घेता येणार नाही. या योजनेव्यतिरिक्त रुपे डेबिट कार्डावर खातेधारकाचा कोणत्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास तीस हजाराचा वीमा कव्हर मिळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Prime Minister Jan Dhan account will get Rs 5000 from the overdraft scheme