पंढरपूर शहरात अतीवृष्टी नुकसानीचो पंचनामे सुरू 

अभय जोशी
Tuesday, 20 October 2020

आज शहरातील पूरग्रस्त भागात पंचनामे सुरू असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, झोनल ऑफिसर चिदानंद सर्वगोड, पंढरपूर सर्कल श्री. वाघमारे यांनी समक्ष सर्व्हे चालू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन काम योग्य रितीने चालू आहे किंवा नाही याची पाहणी केली. 

पंढरपूर(सोलापूर) : पंढरपूर शहरांमध्ये नुकताच पूर येऊन गेला. ज्या भागात पुराचे पाणी आले होते, त्या ठिकाणच्या घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महसूल प्रशासन, नगर परिषद आणि मंदिर समितीचे कर्मचारी हे काम करत आहेत. 

हेही वाचाः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बुधवारी तुळजापूरच्या दौऱ्यावर 

आज शहरातील पूरग्रस्त भागात पंचनामे सुरू असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, झोनल ऑफिसर चिदानंद सर्वगोड, पंढरपूर सर्कल श्री. वाघमारे यांनी समक्ष सर्व्हे चालू असलेल्या ठिकाणी भेटी देऊन काम योग्य रितीने चालू आहे किंवा नाही याची पाहणी केली. 

हेही वाचाः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नातेपुते शहरात प्रभागनिहाय अँटिजेन टेस्ट 

ज्यांच्या घरांमध्ये पुराचे पाणी आले होते, असे कोणतेही घर सर्व्हेमधून राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक सुजित सर्वगोड व माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम बोहरी यांनी या भागातील नागरिकांच्या अडचणी मांडल्या.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punchnama of heavy rain damage started in Pandharpur city