अकलूज उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई 

goun_khanij
goun_khanij

लवंग (सोलापूर) : क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे, वाहन पासिंग न करता ऊस वाहतूक करणे, नियमबाह्य गौण खनिज वाहतूक करणे अशा दोषी आढळलेल्या 234 वाहनांवर अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करून 93 लाखांचा दंड वसूल केला आहे. तसेच या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व साखर कारखान्यांतील पासिंग न करता आणि क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहतूक करण्यामध्ये दोषी आढळलेल्या 90 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 82 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली. 

जानेवारी 19 ते नोव्हेंबर 20 मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी वायुवेग पथकातील वाहन निरीक्षक पूनम होटकर, अक्षय खोमणे, अक्षय पोमन, रोहित भोसले, सनी कुडपणे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करण्यात दोषी आढळलेल्या 33 वाहनांवर कारवाई करून दहा लाख 73 हजार, भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणाऱ्या 143 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 62 लाख 74 हजार, तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या भार क्षमतेच्या जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या 58 दोषी वाहनांकडून 19 लाख 56 हजार असा एकूण 93 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियानानुसार कार्यक्षेत्रात असणाऱ्या कारखान्यातील ट्रॅक्‍टर व टेलरना रिफ्लेक्‍टर टेप लावणे कार्यक्रमाअंतर्गत सर्व कारखान्यांना ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्‍टर बसविण्याबाबत सूचना देऊन संबंधित वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी होऊनच ऊस वाहतुकीस परवानगी देण्यात यावी आणि संबंधित वाहने ही क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक करणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत कारखान्यांना लेखी कळवले आहे. दोषी वाहनांवर कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे, असे परिवहन अधिकारी गायकवाड यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com