रबीला मिळतेय खरिपाची साथ : ज्वारीच्या कोठारात केळी, डाळिंब व भेंडीची निर्यात 

प्रकाश सनपूरकर
Friday, 16 October 2020

पाच वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा हा केवळ रबी पिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. मात्र पावसाने मराठवाड्याच्या लगतच्या बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुका, पट्‌ट्‌याच चांगली साथ दिल्याने खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. खरिपामध्ये सोयाबिन, तुर, मुग, उडीद या पिकांची लागवड होऊ लागली आहे. आता शासनाच्या कृषी धोरणात्मक बाबीमध्ये सोलापूर जिल्हा खरिप व रबी या दोन्ही हंगामाचा जिल्हा म्हणून नोंदवला गेला आहे. 

सोलापूरः मागील पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यातील मराठवाड्याच्या लगतच्या भागात होत असलेल्या वाढलेल्या पावसाने खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. पुर्वी रब्बीच्या शेतीचा जिल्हा म्हणून असलेली ओळख आता खरिप शेतीसाठी निर्माण झाली आहे. दोन हंगाम होत असल्याने निवडक पिकाच्या एैवजी अनेक पिकांचे उत्पादन होऊ लागले आहे. ज्वारीचे कोठार ही ओळख कायम ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावर डाळिंबाचा देखील समावेश ग्लोबल मार्केटसाठी केला गेला आहे. 

हेही वाचाः मंगळवेढा तालुक्‍यात 138 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर 

पाच वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा हा केवळ रबी पिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. मात्र पावसाने मराठवाड्याच्या लगतच्या बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुका, पट्‌ट्‌याच चांगली साथ दिल्याने खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. खरिपामध्ये सोयाबिन, तुर, मुग, उडीद या पिकांची लागवड होऊ लागली आहे. आता शासनाच्या कृषी धोरणात्मक बाबीमध्ये सोलापूर जिल्हा खरिप व रबी या दोन्ही हंगामाचा जिल्हा म्हणून नोंदवला गेला आहे. 

हेही वाचाः दसरा-दिवाळीत मैसूर, हुबळी, वाराणसी,यशवंतपूर व सिकंदराबादसाठी विशेष रेल्वे 

खरिपाच्या माध्यमातून नवी पीके घेतली जाऊ लागली आहेत. ज्वारीचे कोठार म्हणून असलेली सोलापूर जिल्हयाची ओळख कायम राहिली आहे. ज्वारीचे पीकाचे क्षेत्र 2.34 लाख हेक्‍टर कायम आहे. या सोबत जागतिक बाजारपेठेसाठी उपयुक्त असलेली ज्वारीची ओळख एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत केंद्र सरकारने नोंद घेतली. पुढील काळात जागतिक बाजारपेठेत अधिक दरासाठी लागणारी ही ओळख उपयुक्त ठरेल. .तूरीचे क्षेत्र आता एक लाख हेक्‍टरपेक्षा अधिक झाले आहे. सोयाबिनचे क्षेत्र देखील काही वर्षात वाढले आहे. 
फळबागांच्या बाबतीत जिल्ह्यात आतापर्यत एक लाख हेक्‍टर क्षेत्र हे फळबागांचे आहे. त्यामध्ये डाळिंब लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. एक जिल्हा एक उत्पादन नोंदणीत डाळिंबाची देखील नोंदणी झाली आहे. डाळिंबाची निर्यात देखील वाढीस लागली आहे. त्या सोबत उस पीकाला पर्याय म्हणून वाढलेल्या केळीचे क्षेत्रातून केळीची निर्यात होऊ लागली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या योग्य प्रयत्नामुळे जिल्ह्यातील शेतीक्षेत्रात निर्यात वाढत चालली आहे. 
भाजीपाला लागवडीमध्ये सिमला मिरची, दोडका आदी भाज्या मोठ्या प्रमाणात वाशी व पुणे बाजारपेठेत पोहोचत आहे. माळशिरस तालुक्‍यातील भेंडीची निर्यात होत आहे. भेंडीची ही निर्यात जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादकांसाठी प्रेरणादायी बनली आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या शेतीतील बदल 
पाच वर्षापूर्वी 
खरीप क्षेत्र : 79 हजार हेक्‍टर 
रबी क्षेत्र : 7.21 लाख हेक्‍टर 

सध्याची स्थिती 
खरीप क्षेत्र : 2.34 लाख हेक्‍टर 
रबी क्षेत्र : 5.86 लाख हेक्‍टर 

सध्याची पीकाची क्षेत्रे 
तूर : 1 लाख 10 हजार हेक्‍टर 
ज्वारी : 3.31 लाख हेक्‍टर 
फळबागा : 1 लाख हेक्‍टर 
डाळिंब : 40 हजार हेक्‍टर 
उस :  1.50 लाख हेक्‍टर 
केळी : 7 हजार 710 हेक्‍टर 

पुढील काळातील संधी 
- सोलापूर ज्वारीची नोंद जागतिक स्तरावर झाल्याने ज्वारी प्रक्रिया उत्पादनासाठी संशोधन व उत्पादनास वाव 
- डाळिंब क्षेत्रासाठी संशोधन, मुलभुत सुविधा, निर्यातीसाठी वाढणार गुंतवणूक 

बदलती शेती सोलापुर जिल्ह्याची 
- रब्बीचा जिल्हा एैवजी खरीप पीकांचे वाढते क्षेत्र 
- ज्वारी व डाळिंबाचे क्षेत्र ठरणार महत्वाचे 
- भेंडी या एकमेव फळवर्गीय भाजीची निर्यात 
- डाळिंब व केळीची निर्यात 
- उसाचे क्षेत्राला निर्यातक्षम केळीचा पर्याय वाढता 

कृषी खात्याच्या योजनांचा लाभ 
जिल्ह्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी कृषी खात्याच्या विविध योजनांची अमंलबजावणी प्रभावी पणे राबवल्या जात आहेत. 
- रविंद्र माने, कृषी उपसंचालक, सोलापूर.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabi gets kharif support: Banana, pomegranate and okra exported to sorghum barns