राहुल तेवतियाची इनिंग ही कोरोनावर विजय मिळवण्याची प्रेरणा हा संदेश होतोय व्हायरल 

rahul tewatiya.jpg
rahul tewatiya.jpg

सोलापूरः शारजा येथील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्या मध्ये झालेल्या सामन्यातील राहुल तेवतियाच्या शेवटच्या क्षणी जिंकून देणारी बॅंटिंगप्रमाणे कोरोनाला हरवण्याची तयारी करावी असे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

शारजा येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात सोळाव्या ओव्हर मधील तिसरा बॉल पडल्यावर हिंदी कमेंट्री करताना आकाश चोप्रा म्हणाला " इस वक्त आधा भारत राहुल तेवतिया को दोषी मान रहा होगा के ये मॅच उनके वजह से हार रहे हैं! वो जिता नहीं सकते. 
जिंकण्यासाठी हवा असलेला रन रेट अशक्‍यरित्या 17 वर पोहचला. दोन बॉल खेळलेला नवा बॅट्‌समन रॉबिन उत्तप्पा पिचवर होता व राहुल तेवतिया गेल्या तासाभरापासून चाचपडत खेळत होता. त्यामुळे सामना राजस्थान रॉयल्सने जिंकण्याची तसूभरही आशा उरली नव्हती. तेवतियाने पिचवर आल्यापासून एकदाही बॉलसोबत नीट टायमिंग साधू शकला नव्हता. वीस बॉल्स खेळून एकसुद्धा चौकार किंवा षटकार खेचला नव्हता. तो जीव तोडून प्रयत्न करत होता पण यश मिळत नसल्याने फक्त हसं होत होतं. सतरावी ओव्हर संपल्यावर किंग्स इलेव्हन पंजाब : 98% तर राजस्थान रॉयल्स : 2% जिंकण्याची शक्‍यता दाखवत होते. 

अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्युट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला. डावखोऱ्या कॉट्रेलच्या पहिल्या चार बॉलवर डीप स्क्वेअर लेग, मिड ऑनवरून व लॉंग ऑफ वरून चार सिक्‍स आणि सहाव्या बॉलवर पुन्हा सिक्‍स हाणून राहुल तेवतीयाने राजस्थान रॉयल्सला मॅचमध्ये परत आणलं. कॉट्रेलच्या एक ओव्हरमध्ये 30 रन्स काढले त्यानंतर मोहम्मद शमीला सिक्‍स मारुन शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स काढायचे शिल्लक तेवतीयाने बाकी ठेवले. केवळ 12 बॉल्समध्ये हरलेल्या राहुल तेवतियाने सामना फिरवला होता. शेवटी हॅपी एंडिंग राहुल तेवतीयाला मिळालंच. मॅच जिंकल्यावर तेवतीया संदर्भात आकाश चोप्रा सुनील गावस्करांना म्हणाला "मान लो हार है ठान लो तो जीत हैं!" 
ती इनिंग बघितल्यावर वाटलं की फक्त एक खेळी नाही. ही इनिंग या वर्षातील सद्य आजूबाजूलाला असलेल्या परिस्थितीसाठी अगदी चपखल बसत आहे. राहुल तेवतियाच्या ते एकतीस बॉल्स त्यातील पहिले चाचपडवणारे 20 बॉल्स 2020ची परिस्थिती व पिक्‍चर दाखवत आहे. आजूबाजूला चहुबाजूला कोरोना पसरला आहे. अर्थव्यवस्थेची शकलं झाली आहेत. दररोज लाखो नोकऱ्या जात आहेत. नातेसंबंधांमध्ये, व्यवहारांमध्ये अनिश्‍चितता, कटुता निर्माण झाली आहे. लॉकडाउन-अनलॉकिंग प्रक्रियेत लोक घरात बसून त्यांची मनंही आंबली आहेत. शाळेतील विद्यार्थी घरी अडकून त्रस्त झाली आहे त्यामुळे पालकांच्या मूळच्याच त्रस्ततेत अधिक भर पडत आहे. 
एकंदर कोणाशीही बोललं तरी तो मनाने निराश किंवा तीक्ष्ण वाटतोय. सोशल मीडियावर उसनं अवसान आणलं जात आहे. सगळीकडे चिडचिडेपणा वाढला आहे. प्रेम संबंध, मैत्री संबंध, कार्यालयीन संबंध सगळीकडे नकारात्मकता, कटुता, अनिश्‍चितता पसरली आहे. कारण पूढे दिसत आहे तो अनिश्‍चिततेचा गडद अंधार. आताच गरज आहे ती राहुल तेवतीयाची इनिंग समजून घेण्याची. हा कोड संदेश आहे 2020चा, तो डिकोड करायला हवा.मॅच हातातून सुटतेय आणि पराभवाला आपण कारणीभूत ठरणार आहोत, हे तेवतियाला समजलं नसेल का. त्याच्या हातात इतकंच होतं की जे समोर येईल त्यावर बेस्ट देण्याचा प्रयत्न करणं. तो 'प्रयत्न' त्याने केला. पहिले वीस बॉल त्याला यश आलंच नाही. कदाचित त्यालाही हे माहित नव्हतं की आता अठराव्या ओव्हरला आपण गेम चेंज करणार आहोत. पण टप्प्यात आलेला बॉल आणि संधी त्याने अचूक हेरली आणि तेवतीया गेम चेंजर बनला. वर्ष आणि सामन्यातील इनिंग हाच संदेश देत आहे. "पिच सोडू नका, स्वतःहून रिटायर्ड आऊट होऊ नका". 
वर्षात एखादी गेम चेंजर ओव्हर प्रत्येकाच्या आयुष्यात आलीच आहे, नसेल तर ती येणारच आहे. फक्त तोवर उभं राहायचं आहे. जीव तोडून प्रयत्न करायचा आहे. जिंकण्याची शक्‍यता आणणारा तेवतिया, त्याने कॉट्रेलच्या अठराव्या ओवरमधील सणसणीत सिक्‍सर्समधून दाखवलं आहे. सामन्यातील राहुल तेवतीयाचा ती खेळी, त्याआधी किलिंग बॉलिंग करणारा कॉट्रेल, सामन्यातील वा ओव्हर आणि वर्ष व कोरोना हा एक संदेश आहे बस तो समजून घ्यायला हवा असे सांगणारे संदेश सोशल मिडियावर दिले जात आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com