सोलापुरातील उद्योगांच्या टेकऑफसाठी नेमके हवे तरी काय, ते वाचा

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 18 जून 2020

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोलापूर परिसरात आता उद्योगाची चक्रे काही प्रमाणात फिरू लागली आहे. गारमेंट उद्योगापैकी अर्धे उद्योग सुरू झाले आहेत. बाजारपेठेत आता व्यवहार सुरू झाले आहेत. 

सोलापूर: जिल्हाभरातील कारखानदारी व विविध उद्योगांना आता लॉकडाउननंतर उभारी मिळण्यास सुरवात झाली आहे. काही प्रमाणात उत्पादने सुरू झाली असली तरी शासनाकडून मदतीऐवजी अनेक चांगल्या सवलतींची गरज आहे. याबाबत शासनाच्या घोषणेकडे या क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचाः महापालिकेसाठी ग्रामीणची मदत घ्या, पण सोलापूरचा मृत्यूदर कमी करा 

अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोलापूर परिसरात आता उद्योगाची चक्रे काही प्रमाणात फिरू लागली आहे. गारमेंट उद्योगापैकी अर्धे उद्योग सुरू झाले आहेत. बाजारपेठेत आता व्यवहार सुरू झाले आहेत. 

हेही वाचाः अक्कलकोटमध्ये आणखी एक कोरोना बाधित सापडला 

उद्योजकांना भांडवल व कामगारांची जुळवाजुळव करावी लागली. तसेच त्यासोबत आवश्‍यक ते आर्थिक नियोजन देखील महत्त्वाचे ठरले. उद्योग सुरू करायचा तर वीजबिलाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लॉकडाउनच्या काळात महावितरणने मीटरचे रीडिंग न घेताच सरासरी बिले आकारली. उद्योग चालू असलेल्या महिन्यातील बिले उद्योग बंद असलेल्या महिन्यात आकारली गेली. त्यानंतर आता मीटर रीडिंगला परवानगी मिळाली आहे. निदान अचूक रीडिंग घेऊन बिल आकारणी करणे महत्त्वाचे आहे. बिलाच्या रकमेतील ही तफावत भरून काढणे गरजेचे आहे. याचा फटका उद्योजकांना बसला आहे. 
नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी काही सवलतींची गरज निर्माण झाली आहे. उद्योग व कारखान्यांना वापरलेल्या विजेच्या बिलाची रक्कम देणे शक्‍य आहे. मात्र लॉकडाउन व नंतरच्या कालावधीत वीज बिलातील स्थिर आकार माफ होणे आवश्‍यक आहे. सरासरी बिले बदलून अचूक रीडिंगची बिले दिली तर आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे. 
उद्योजकांनी खेळत्या भांडवलासाठी जी कर्जे घेतली आहेत, त्यावरील व्याजात किमान तीन टक्के सवलत मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे उत्पादने विक्रीआधी येणारा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. अनलॉकनंतर लगेचच म्हणजे जीएसटी टॅक्‍स भरण्याची मुदत ता. 26 जून अशी आहे. त्यास मुदतवाढ केली तर त्यामध्ये उद्योजकांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही. मिळकत करामध्ये कोरोना संकटामुळे 50 टक्के सवलतीची अपेक्षा उद्योगक्षेत्राला आहे. 

शासनाकडे मागण्याचा पाठपुरावा 
उद्योजक व कारखानदारांना त्यांचे उत्पादन सुरू करण्यासाठी काही आर्थिक सवलती दिल्या पाहिजेत. तरच त्यांच्या उत्पादन निर्मितीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे आम्ही मागण्या मांडत आहोत. 
- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर् ऑफ कॉमर्स, सोलापूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read on for exactly what is needed for the takeoff of industries in Solapur

टॅग्स
टॉपिकस