संयम व धैर्याने ज्येष्ठांनी लढली कोरोना संकटाची लढाई 

प्रकाश सनपूरकर
Thursday, 1 October 2020

कोरोनाच्या महामारीमुळे ज्येष्ठांसाठी अत्यंत कसोटीचा काळ होता. कोणत्याही स्थितीत घराबाहेर जाणे धोक्‍याचे होते. त्यातच वृध्द व इतर आजारांचे ज्येष्ठ रुग्णांना या बाबत विशेष काळजी घ्यावी लागली. 

सोलापूरः कोरोनाच्या काळात घरी थांबून सर्व नियमांचे काटेकोर पालन करत वाचन, लेखनासह आत्मचरित्राचे लेखन देखील सुरू केले. हा काळा कसोटीचा असून केवळ बॅंकेच्या व्यवहाराशिवाय इतर कोणत्याही कामासाठी बाहेर न पडण्याचा नियम पाळत ज्येष्ठांनी लॉकडाउनचा कालावधी सुरक्षित राहण्यासाठी स्वतःची अत्यंत काळजी घेतली असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त काहीजणांशी संवाद साधला असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. 

हेही वाचाः सोलापूर येथील गैबी पीर दर्गा परिसरात घाणीचे साम्राज्य 

कोरोनाच्या महामारीमुळे ज्येष्ठांसाठी अत्यंत कसोटीचा काळ होता. कोणत्याही स्थितीत घराबाहेर जाणे धोक्‍याचे होते. त्यातच वृध्द व इतर आजारांचे ज्येष्ठ रुग्णांना या बाबत विशेष काळजी घ्यावी लागली. 

हेही वाचाः लोहाऱ्यातून 30 हजार घेऊन दोन मुले सोलापूरमार्गे पुण्याला जात होते पळून पण.... 

या कालावधीत अनेक ज्येष्ठांनी घरातच स्वतःला गुंतवून घेतले. ज्येष्ठ नागरिकांचे सायंकाळचे मोकळे फिरणे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, आदी बंद झालेले होते. अनेक ज्येष्ठांनी घराच्या परिसरात व्यायाम, बागकाम, वाचन व लेखनाचे काम केले. साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मनोहर चव्हाण यांनी या कालावधीत कोरोना बाधित झालेल्या ज्येष्ठ नागरिक सदस्यांच्या कुटुंबीयांना उपचार शुल्क सवलतीसाठी मोठे प्रयत्न केले. काळजी घेण्यासाठी ते सर्व ज्येष्ठांशी संवाद साधत होते. 
ज्येष्ठ नागरिक मोहन देसाई यांनी मित्राच्या फर्माईशवरून "आम्ही सारे भुत्ये' या कथेतून पंधरा भुतांची सुंदर गोष्ट लिहिली. तसेच डिएनए बद्दल देखील सुंदर लेखन केले. एक हजार पानाचे शंकराचार्यांनी लिहिलेले पुस्तक त्यांनी वाचून काढले. निवृत्त एनसीसी अधिकारी प्रा.एम.ए. शेख यांनी लॉकडाउनच्या काळात मराठी आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी कादंबऱ्यांचे वाचन केले. तसेच स्वतःचे आत्मचरित्र लेखनास याच कालावधीत सुरुवात केली. काही उत्तम टिव्ही मालिका देखील त्यांनी पाहिल्या. 
ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत कोडगिरवार यांनी लॉकडाउनच्या काळात त्यांच्या बागकामाच्या छंदाला प्राधान्य दिले. बागेत काम करून अनेक रोपे तयार केली. अनेक औषधी झाडांच्य रोचे त्यांनी वाटप केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With restraint and courage, the elders fought the Corona Crisis