राजावर स्वार होत दस्तगीर यांची शहरात रपेट 

राजावर स्वार होत दस्तगीर यांची शहरात रपेट 
Updated on

सोलापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सोलापुरात संचारबंदी आहे. संचारबंदी पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व नाके बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य गावांतील व्यक्तीस दुचाकी किंवा चारचाकी गाडी घेऊन जाता येत नसल्याने दर्शनाळ (ता. अक्कलकोट) येथील दस्तगीर यांनी सोलापुरात राजा नावाच्या घोड्यावर स्वार होत रपेट मारली. 

हेही वाचा : गर्दी टाळण्यासाठी असे करा मॉर्निग वॉक 

संचारबंदी पार्श्‍वभूमीवर शहरात येणाऱ्या सर्व नाक्‍याच्या ठिकाणी गाड्या अडवून परत पाठवत आहेत. शुक्रवारी अक्कलकोट तालुक्‍यातील 68 वय असणारे दस्तगीर पठाण यांना पत्नीच्या गोळ्या घेण्यासाठी आणि बॅंकेच्या कामासाठी सोलापुरात यायचे होते. शेतकरी असलेल्या श्री. पठाण यांना दोन मुले आहेत. दोघांकडे चारचाकी गाड्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू केल्याने घराबाहेर गाड्या घेऊन जाता येत नाही. मात्र, पत्नीच्या गोळ्या आणि आसरा चौकातील बॅंक ऑफ बडोदा शाखेत त्यांचे महत्त्वाचे काम होते. मात्र, शहरातील सर्व नाके बंद करण्यात आसल्याने गाडीतून आलेल्यांना अडवत असल्याने दस्तगीर हे थेट घोड्यावर स्वार होत दर्शनाळ येथून सकाळी आठ वाजता घरातून बाहेर निघून दुपारी 12 वाजता सोलापुरात पोचले. टिकळ चौकातील डॉ. मेहता यांच्या हॉस्टिलमध्ये जाऊन पत्नीस आवश्‍यक असणाऱ्या गोळ्या घेतल्या. त्यानंतर ते विजयपूर वेस, रंगभवन मार्गे थेट आसरा चौक आले. आसरा चौकातील बॅंक ऑफ बडोदा येथील शाखेत काम केले. त्यानंतर माघारी निघाले. वाटेत मुळेगाव येथे पाहुण्यांच्या घरी थांबून घोड्याला पाणी आणि चारा खाऊ घातला. श्री. पठाण यांना घोड्यावर रपेट मारण्याची आवड आहे. संचारबंदी काळात त्यांना असाही आपल्या राजामुळे दिलासा मिळाला. 

पोलिसांकडून चौकशी 
घोड्यावर स्वाग होत सोलापूर शहरात हिंडत असताना दस्तगीर पठाण यांना चौकाचौकात पोलिसांकडून विचारणा झाली. मात्र, त्यांनी कोणत्या कामासाठी आलो हे सांगितल्यानंतर सोडण्यात आले. मात्र, पोलिसांनी घोडा चालविण्याची परवानगी घेतली आहे का, असे विचारले असता श्री. पठाण म्हणाले की, घोडा घेऊन सहा महिने झाले असून अजून परवानगी घ्यायची आहे. दस्तगीर पठाण यांनी सोलापूर शहरात घोड्यावर स्वार होत रपेट मारून शहरवासियांचे लक्ष वेधले. वासियांचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com