एस. पी. पब्लिक स्कूलचा पार्थ वलगे पंढरपूर तालुक्‍यात प्रथम 

महेश काळे
Saturday, 21 November 2020

शिष्यवृत्ती परीक्षेला प्रशालेचे 25 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. यात 8 वी मधील पार्थ संतोष वलगे हा तालुक्‍यात प्रथम आणि जिल्ह्यात 16 वा, पृथ्वीराज नंदकुमार काटकर जिल्ह्यात 45 वा, श्रेया विकास उलभगत जिल्ह्यात 108 वी, पूनम दत्तात्रय भगत जिल्ह्यात 299 वी 
आली आहे तर इयत्ता 5 वी मधील संचीता संतोष फाळके जिल्ह्यात 140 वी, श्रेया नंदकुमार काटकर जिल्ह्यात 272 वी, मनस्वी प्रवीण खळगे गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 323 वी आली आहे. 

पटवर्धन कुरोली (सोलापूर) ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे वतीने फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पंढरपूर तालुक्‍यातील नांदोरे येथील एस. पी. पब्लिक स्कूलचे सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून ग्रामीण सर्वसाधारण मधून इ.8 वी मधून पार्थ वलगे हा तालुक्‍यात प्रथम आला आहे. 

हेही वाचाः अन्नदानाच्या चळवळीत लोकांनी पुढे यावे ः अभिनेते सुमित पुसावळे यांचे आवाहन 

शिष्यवृत्ती परीक्षेला प्रशालेचे 25 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत. यात 8 वी मधील पार्थ संतोष वलगे हा तालुक्‍यात प्रथम आणि जिल्ह्यात 16 वा, पृथ्वीराज नंदकुमार काटकर जिल्ह्यात 45 वा, श्रेया विकास उलभगत जिल्ह्यात 108 वी, पूनम दत्तात्रय भगत जिल्ह्यात 299 वी 
आली आहे तर इयत्ता 5 वी मधील संचीता संतोष फाळके जिल्ह्यात 140 वी, श्रेया नंदकुमार काटकर जिल्ह्यात 272 वी, मनस्वी प्रवीण खळगे गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 323 वी आली आहे. 

हेही वाचाः लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा 27 डिसेंबरला 

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा. महादेव तळेकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. अण्णासाहेब कोरके, पत्रकार आण्णासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक डॉ, नंदकुमार होनराव, अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, शाळा समीतीचे अध्यक्ष नवनाथ भिंगारे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे यांनी केले.यशस्वी विद्यार्थ्यांना प्रकल्प संचालिका सौ. वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक सूरज अलगुडे, शहाजी साठे, जीवन वाहेकर, संजय टिंगरे, सोमनाथ ढावरे, अमोल तेली, विद्या कोरके यांनी मार्गदर्शन केले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. अण्णासाहेब कोरके, फिरोज सय्यद यांचे मार्गदर्शन मिळाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: S. P. Parth Valge of Public School is the first in Pandharpur taluka